'मकडी' फेम अभिनेत्रीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल

वर्षभरापूर्वी गुपचूप केला होता विवाह

Updated: Jan 21, 2020, 02:06 PM IST
'मकडी' फेम अभिनेत्रीकडून घटस्फोटाचा अर्ज दाखल  title=

मुंबई : 'मकडी' फेम अभिनेत्री श्र्वेता बासू प्रसादने आपल्या पतीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. वर्षभरापूर्वी गुपचूप लग्नगाठ बांधलेल्या श्र्वेताने काही दिवसांपू्र्वीच पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती. आता तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. 

काही दिवसांपूर्वी श्र्वेताने आपण दोघेही सहमतीने वेगळे होत असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर केली होती. श्र्वेताच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. कोर्टातून आपण कायदेशीररित्या विभक्त होत असल्याचं श्र्वेताने सांगितलं आहे. घटस्फोटानंतर आम्ही चांगलेच मित्र राहू अशी भावना श्र्वेताने व्यक्त केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on

सोशल मीडियाच्या मआध्यमातून तिने याबाबतची माहिती दिली. आपण दोघांनीही परस्पर सामंजस्याने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेत असल्याचं तिने या पोस्टच्या माध्यमातून सांगितल्याचं पाहायला मिळालं. 'रोहित आणि मी दोघांनीही परस्पर सामंजस्याने या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला आहे. जवळपास महिनाभर विचार केल्यानंतर एकमेकांच्या हितासाठी हेच योग्य असण्याच्या निर्णयावर आम्ही पोहोचलो', असं तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on

श्र्वेता आणि रोहित यांची लव्हस्टोरी पाच वर्षांपूर्वी सुरू झाली होती. 'फँटम' सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. लग्नाआधी दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 2017 मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर 13 डिसेंबर 2018 रोजी श्र्वेताने निर्माता रोहित मित्तलसोबत अतिशय खासगी पद्धतीने लग्न केलं. पण आता हे नातं संपणार असल्याच समोर येत आहे. 

सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती अभिनेत्री 

2014 मध्ये श्र्वेता एका सेक्स स्कँडलमध्ये अकली होती. हैदराबादमध्ये एका रेस्क्यू होममध्ये श्र्वेताला ठेवण्यात आलं होत. यानंतर हैदराबाद सेशन कोर्टाने क्लीन चीट दिल्यानंतर सोडण्यात आलं होतं.