"हाय गर्मी..." अभिनेत्रीचं stunning फोटोशूट पाहून मुलगी म्हणाली...

2 लाखांहून अधिक लोकांनी तिची ही पोस्ट लाईक केली आहे

Updated: Aug 25, 2021, 03:28 PM IST
"हाय गर्मी..."  अभिनेत्रीचं stunning फोटोशूट पाहून मुलगी म्हणाली... title=

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. एकीकडे ती 'खतरों के खिलाडी 11' या रिअॅलिटी शोमध्ये इतर स्पर्धकांना जबरदस्त आव्हान देत आहे आणि दुसरीकडे ती तिच्या फोटोंसह सगळ्यांच लक्षवेधून घेत आहे.

 तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवड आहे.

2 लाखांहून अधिक लोकांनी तिची ही पोस्ट लाईक केली आहे.

हे फोटो शेअर करताना श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे - मूनलाईट. तिच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने रोझ गोल्ड कलरचा पोशाख घातला आहे. ड्रेप स्कर्टसह क्रॉप टॉपमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.

श्वेताच्या या पोस्टवर तिची मुलगी पलक तिवारी सह संगीता बिजलानी, रिद्धिमा पंडितसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत पसंती दर्शवली आहे. काहींनी तिला जबरदस्त तर काहींनी हॉट म्हटले.