बिकिनीमध्ये आंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी; ते क्षण कॅमेरात कैद

श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 

Updated: Jun 2, 2022, 02:59 PM IST
बिकिनीमध्ये आंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी; ते क्षण कॅमेरात कैद title=

मुंबई : श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वयाच्या 41 व्या वर्षीही ही अभिनेत्री आपल्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पारा चढवत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ आजचा नाही तर करिअरच्या सुरुवातीचा आहे. श्वेता तिवारीला हेडलाईन्समध्ये कसं राहायचं हे तिला चांगलच माहित आहे. त्यामुळेच ती कोणत्याही मालिकेत काम करत नसली तरी नेहमी ती चर्चेत राहते. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती जंगलात आंघोळ करताना दिसत आहे.

श्वेताचा व्हिडिओ  व्हायरल 
इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काही ना काही पोस्ट शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतं. चाहते तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात.

'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. यासोबतच तिने बॉलीवूड, भोजपुरी सिनेमा, मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे. चाहत्यांना तिच्या अभिनयाचे वेड आहे. पण सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अंघोळ करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री बिकिनी आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून धबधब्यासमोर आंघोळ करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ खूप बोल्ड आहे. ज्यामुळे हा व्हिडिओ त्यावेळीही खूप चर्चेत आला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच शोचा टीआरपी खूप वाढला होता. पण शोचा टीआरपी एवढ्या उंचावर नेणाऱ्या श्वेता तिवारीचा प्रवास फार मोठा नव्हता. तिने लवकरच शो सोडला.