श्वेता तिवारीच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा; फोटो व्हायरल

आज ही अभिनेत्री घरा-घरात ओळखली जाते.

Updated: May 14, 2022, 05:04 PM IST
श्वेता तिवारीच्या बोल्ड लूकची जोरदार चर्चा; फोटो व्हायरल title=

मुंबई  : अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अभिनय कारकिर्दीत आतापर्यंत अशी अनेक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या आहेत की लोकांना तिच्या अभिनयाची खात्री पटली आहे. श्वेता केवळ आणि केवळ स्वबळावर इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवू शकली आहे. आज ही अभिनेत्री घरा-घरात ओळखली जाते. देशभरात तिच्या चाहत्यांची कमी नाही. आज लोकं तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत.

श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
श्वेता काही काळापासून तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या प्रोजेक्ट्समुळेच नाही तर तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. जवळपास दररोज श्वेताचा नवीन आणि बोल्ड अवतार लोकांना आश्चर्यचकित करत आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये श्वेता खूपच सुंदर आणि सिझलिंग दिसत आहे.

श्वेताने  शेअर केला आहे सिझलिंग लूक
फोटोंमध्ये श्वेता काळ्या रंगाचा ट्रान्सपरंट फ्रंट ओपन गाऊन परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने डेनिम शॉर्ट्स आणि ब्लॅक ब्रॅलेट कॅरी केलं आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने काळ्या रंगाचे हाय हील्स बूट घातले आहेत. इथे तिने आपली वेगळी स्टाइल दाखवत अनेक पोज दिल्या आहेत. या फोटोंमध्ये श्वेताही खूप आनंदी दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्जिन भास्कर’
सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेल्या 'व्हर्जिन भास्कर' वेब सीरिजचे आतापर्यंत 2 सीझन रिलीज झाले आहेत. भाग 3 देखील लवकरच रिलीज होण्याची अपेक्षा आहे. या वेब सीरिजमध्ये कॉमेडीसोबतच अनेक बोल्ड सीन्सही पाहायला मिळणार आहेत.