जेव्हा सामान्य मुलगा नरेंद्र मोदींची मिमिक्री करतो....

आपल्या देशात बरीच कला आणि कलाकार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 26, 2017, 08:44 PM IST
जेव्हा सामान्य मुलगा नरेंद्र मोदींची मिमिक्री करतो....  title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : आपल्या देशात बरीच कला आणि कलाकार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशाच एका अफलातून कलाकाराने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्याचे नाव आहे श्याम रंगीला. त्याची कला पाहून उपस्थित प्रेक्षक, परीक्षक सगळेच हसून हसून लोटपोट झाले. 

आपल्याला मिळालेली संधी साधत श्यामने आपली कला बहरदारपणे सादर केली. त्यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची हुबेहूब नक्कल केली आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. 

श्याम रंगीलाच्या या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी युट्युबवर श्यामचे अधिक व्हिडीओ सर्च करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानच्या श्री गंगानगर भागातील हा सर्वसामान्य मुलगा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.