सिद्धार्थ 'या' चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Aug 2, 2019, 08:46 PM IST
सिद्धार्थ 'या' चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच त्याच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. सिद्धार्थ जाधवचं मराठी रंगभूमीवर गाजलेलं 'जागो मोहन प्यारे' हे नाटक आता चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

प्रियदर्शन जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. 

'जागो मोहन प्यारे' या नाटकात सिद्धार्थ जाधवने 'मोहन' ही महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारली होती. आता चित्रपटातून सिद्धार्थसह अनिकेत विश्वासराव, दीप्ती देवी प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

'जागो मोहन प्यारे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून आगामी नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी रंगभूमीवर सिद्धार्थनी साकारलेल्या 'मोहन'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता या चित्रपटातून सिद्धार्थ काय कमाल करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.