Shehnaaz Gill ने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन तेव्हाही होती सिद्धार्थची साथ, कशी ते पाहा

निधनानंतरही सिद्धार्थने सोडली नाही शहनाजची साथ, लालबागच्या राजाच्या दर्शनालाही अभिनेत्रीसोबत, Video Viral   

Updated: Sep 6, 2022, 12:16 PM IST
Shehnaaz Gill ने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन तेव्हाही होती सिद्धार्थची साथ, कशी ते पाहा title=

मुंबई : पंबाजची कतरिना म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शहनाज. बिग बॉसनंतर (Bigg boss) शहनाजच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात शहनाजला खरं प्रेम तर मिळालं, पण त्या प्रेमाने शहनाजची अर्ध्यावर साथ सोडली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत (Siddharth shukla ) असलेलं अभिनेत्रीचं नातं आणि साध्या, खोडकळ स्वभावामुळे शहनाज कायम चाहत्यांच्या मनात राहिली. एवढंच नाही तर, सिद्धार्थ आणि शहनाजच्या लग्नाच्या चर्चांनी देखील चाहत्यांमध्ये जोर धरला. .

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली. अभिनत्यांच्या निधनानंतर दोघांचे (Shehnaaz-Siddharth) अनेक जुने आणि नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो प्रत्येकाचं लक्ष वेधणारा आहे. 

शहनाज नुकताच भाऊ शाहबाजसोबत लालबागच्या राजाच्या (darshan of Raja of Lalbagh) दर्शनासाठी पोहोचली. तेव्हा शाहबाजच्या हातावर असलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शाहबाजने स्वतःच्या हातावर सिद्धार्थचा चेहरा गोंदवून घेतला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शहनाज तिच्या भावाचा हात धरून उभी आहे. शहनाजने भावाचा जो हात धरला आहे, त्या हातावर सिद्धार्थचा टॅटू स्पष्ट दिसत आहे. (tattoo of Siddharth shukla)

त्यामुळे सिद्धार्थने निधनानंतरही शहनाजची साथ सोडली नसल्याचं याठिकाणी स्पष्ट होत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. पण आता अभिनेत्रीने स्वतःला सावरलं आहे. 

शहनाजचा आगामी सिनेमा (Shehnazcha Upcoming Movies)
शहनाज गिल सध्या बॉलिवूड डेब्यूमुळे (Bollywood debut) चर्चेत आहे. शहनाज  अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.