Sidharth-Kiara Wedding: आली समीप घटिका! आज किआरा होणार मिसेस मल्होत्रा; सूर्यगढमधील बावडीत घेणार सप्तपदी

Sidharth Malhotra-Kiara Advani wedding: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani-Sidharth Malhotra wedding ) हे लव्ह बर्डस अखेर आज लग्नबंधनात अडकणार आहे. जैसलमेरमधील ‘सूर्यगढ पॅलेस’मध्ये शाही थाटामध्ये या दोघांचे लग्न पार पडणार आहे. लग्नासाठी दोन्हीकडच्या काही खास पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे.  

Updated: Feb 7, 2023, 11:22 AM IST
Sidharth-Kiara Wedding: आली समीप घटिका! आज किआरा होणार मिसेस मल्होत्रा; सूर्यगढमधील बावडीत घेणार सप्तपदी
Sidharth Malhotra-Kiara Advani wedding

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Update:  'शेरशाह' चित्रपटातील आपल्या केमिस्ट्रीने देशभरातील चाहत्यांना खूश करणारे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra, Kiara Advani’s wedding) आज (February 7) अखेर लग्नबंधनात अडकणार आहे. राजस्थान येथील सूर्यगड पॅलेसवर (Suryagarh Palace) सिद्धार्थ आणि कियारा यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लागणीसाठी जैसलरमेरला पोहचले आहेत. करण जोहर, मीरा राजपूत, शाहिद कपूर शबीना खानसह अनेक सेलिब्रिटी सूर्यगड पॅलेसमध्ये उपस्थित आहते. इशा अंबानी आणि आनंद परिमल देखील काळ राजस्थानला पोचले आहेत. त्यांच्या लग्नाच्या (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding) समारंभाचे फोटो समोर आले नसले तरी त्यांच्या लग्नानंतरच्या घराबद्दल काही माहिती समोर आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

सूर्यगड पॅलेसमध्ये हा सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding) शाही सोहळा रंगणार आहे. हा भव्य सूर्यगड पॅलेस थारच्या वाळवंटाच्या मध्यभागी स्थित आहे. राजस्थानमध्ये पार पडणाऱ्या शाही विवाहसोहळ्यासाठी दोघांनी जवळपास 84 आलिशान रुम्स बुक केल्या असून याचे भाडे जवळपास एक ते दोन कोटी रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे लग्नाला हजेरी लावणाऱ्या खास पाहुण्यांसाठी 70 लग्झरी गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत.      

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

तसेच सूर्यगढ पॅलेसमधून राजस्थानी स्टाईलमध्ये पाहुण्यांचे स्वागत करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या (Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Video) लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल सजलेले दिसत आहे. प्रवेशद्वारावर पिवळ्या व लाल रंगाच्या फुलांनी रांगोळी काढण्यात आली आहे. राजस्थानी लोककलाकार आपले पारंपारिक नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

लग्नानंतर मिस्टर आणि मिसेस मल्होत्रा लग्नानंतर जुहू येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या आलिशान घरात राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 'सिद्धार्थ लग्नानंतर सुरुवातीला आपल्या बांद्रा येथील घरात राहील. मात्र ते तात्पुरतं असेल. तो जुहू येथे घर शोधत आहे. सिद्धार्थ त्याच्या लग्नाच्या गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या शोधात होता. अभिनेत्याला जुहू येथील एक बंगला आवडला आहे, जो 3 हजार 500 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत तब्बल 70 कोटी रुपये आहे.