Akshay Kumar: 'अरे, थोडी तरी लाज वाटू दे'; 'तो' Video पोस्ट केल्याने अक्षय कुमारवर संतापले Fans

Akshay Kumar Slammed for walking on Indian map: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. 'भारताच्या नकाशावरुन तो चालतोय' असा दावा त्यानेच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनंतर अनेकांनी केला आहे.

Updated: Feb 6, 2023, 10:39 PM IST
Akshay Kumar: 'अरे, थोडी तरी लाज वाटू दे'; 'तो' Video पोस्ट केल्याने अक्षय कुमारवर संतापले Fans title=
Akshay Kumar Slammed for walking on Indian map

Akshay Kumar Slammed for walking on Indian map: बॉलिवूडचा 'खिलाडी' अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमाराने (Akshay Kumar) रविवारी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आपल्या उत्तर अमेरिकेच्या टूअरचं (North America Tour Video) प्रमोशन केलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेत्री दिशा पटाणी, नोरा फतेही, मौनी रॉय, सोनम बाजवाबरोबर अक्षयही दिसत आहे. या प्रमोशनल व्हिडीओमध्ये हे सर्व सेलिब्रिटी पृथ्वीगोलावर म्हणजेच 'अर्थ ग्लोब'वर चालताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अक्षय कुमारविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. कारण या व्हिडीओत अक्षय भारताच्या नकाशावर पाय ठेवत असल्याचं दिसत आहे.

काय म्हटलंय अक्षयने?

अक्षय कुमारनेच ही व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. "मनोरंजन करणारे कलाकार 100 टक्के देसी मनोरंजन उत्तर अमेरिकेत घेऊन येत आहेत. सीट बेल्ट बांधून घ्या, आम्ही मार्चमध्ये येतोय," असं कॅप्शन अक्षयने या व्हिडीओला दिली आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

नेटकऱ्यांनी केली टीका

हा व्हिडीओ पाहून एका ट्विटर युझरने, "एक कॅनडियन अभिनेता भारतीय नकाशावरुन चालत असून भारतीयांचा अपमान करत आहे. हे आपण कसं स्वीकारु शकतो," असं म्हणत अक्षय कुमारला टॅग केलं आहे. "तू या लज्जास्पद कृत्यासाठी 150 कोटी भारतीयांची माफी मागितली पाहिजे," असं एका युझने म्हटलं आहे. "भावा आपल्या भारताचा थोडा तरी सन्मान कर," असा टोला अन्य एका युझरने लगावला आहे.

अनेकांनी या व्हिडीओमधील अक्षय कुमार चालत असल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत अक्षयला 'कॅनडियन अभिनेता' असं म्हणत टीका केली.

पाहूयात काही व्हायरल प्रतिक्रिया...

1) थोडा तरी सन्मान कर

2) कॅनडीयन कुमार म्हणत टीका

3) आम्ही रोज याची पूजा करतो

4) लाज वाटत नाही का

5) यावर बॉयकॉट गँग काय म्हणणार?

कायमच अक्षय होतो नागरिकत्वावरुन ट्रोल

ज्यांना ठाऊक नाही त्यांच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास अक्षय कुमारला कायमच त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केलं जातं. यासंदर्भात अक्षयने मागील वर्षी एका कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली होती. "कॅनडियन पासपोर्ट असल्याने मी तुमच्या पेक्षा कमी भारतीय आहे असं होतं नाही. मी भारतीयच आहे. मला पासपोर्ट मिळाल्यापासून मी 9 वर्ष इथं राहत आहे. हे असं का घडलं याच्या कारणांमध्ये मला जाण्याची गरज वाटत नाही. माझे चित्रपट चालत नाही वगैरे वगैरे ऐकण्याची इच्छा नाही," असं अक्षय कुमार एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हणाला होता.

(वरील बातमीमध्ये मांडण्यात आलेली मतं ही नेटकऱ्यांची असून ती केवळ एकत्रितपणे या बातमीच्या माध्यमातून येथे देण्यात आली आहेत. झी 24 तास डॉट कॉम या मतांशी सहमत नाही.)