Kiara Advani Shawl Price: कियाराच्या 'या' गुलाबी शालची किंमत वाचून थक्क व्हाल; बॅगही लाखमोलाची

Cost Of Kiara Advani Shawl: एअरपोर्टवरील कियारा अडवाणीच्या या साध्या नो-मेकअप, ऑल व्हाइट लूकला या एका गुलाबी रंगाच्या शालमुळे फारच हटके लूक आला होता. मात्र ही शाल अत्यंत महागड्या ब्रॅण्डची आहे.

Updated: Feb 7, 2023, 06:40 PM IST
Kiara Advani Shawl Price: कियाराच्या 'या' गुलाबी शालची किंमत वाचून थक्क व्हाल; बॅगही लाखमोलाची
kiara advani airport

Cost Of Kiara Advani Shawl: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani Wedding) अखेर आज लग्नबंधनामध्ये अडकले. मागील अनेक महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या लग्नाची तारीख आणि इतर माहिती समोर आल्यापासून सोशल मीडियावर या दोघांची तुफान चर्चा होती. आज राजस्थानमध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. स्वत: नववधू असलेली कियाराही (Kiara Advani) शनिवारीच जैसलमेरमध्ये दाखल झाली होती. विमानतळाबाहेर कियाराची झलक कॅमेरामध्ये टीपण्यासाठी पापाराझींनी एकच गर्दी केली होती. यावेळी कियारा अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. मात्र आता तिच्या या एअरपोर्ट लूकचा महत्त्वाचा भाग असलेली शाल आणि क्रॉस बॅग चर्चेचा विषय ठरत आहे ती किंमतीमुळे.

शाल अन् हटके लूक

बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीचा समावेश होतो. तिची स्टाइल अगदी साधी पण चारचौघांमध्ये उठून दिसणारी असते. नुकतीच ती स्वत:च्या लग्नासाठी जैलसमेरला पोहोचली तेव्हा या सोबर आणि सिम्पल फॅशनचा सेन्स पुन्हा दिसून आला. कियारा पांढऱ्या रंगाचा फूल स्लीव्ह टॉप आणि ट्राऊझरमध्ये दिसून आले. याचबरोबर तिने आपल्या खांद्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. या गुलाबी शालीमुळे तिच्या साध्या लूकचा फारच हटके लूक आला होता. पण या एका शालीची किंमत सर्वसामान्यांच्या एका महिन्याच्या पगाराहूनही अनेक पटीने जास्त आहे. ही शाल एका फ्रेंच लक्झरी ब्रॅण्डची आहे.

या शालची किंमत किती?

कियारा अडवणाची ही गुलाबी शाल अरमेस लिब्रीस या फ्रेंच लक्झरी ब्रॅण्डची आहे. या शालीची किंमत 1,050 अमेरिकी डॉलर्स इतकी म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 86,000 रुपये इतकी आहे.

लाखमोलाची बॅग

केवळ शालच नाही तर कियाराच्या हातात असलेली बॅग ही लक्झरी ब्रॅण्डची आहे. कियाराच्या हातातील बॅग ही प्राडा कंपनीची हॅण्डबॅग होती. ही प्राडाची 'ट्रँगल सॅफियानो लेदर शोल्डर बॅग' होती. या बॅगची किंमत 2 लाख 44 हजार इतकी आहे. हाय हिल्सचे बूट आणि सनग्लासेसमुळे कियाराच्या लूक अधिक स्टायलिश वाटत होता. कियाराच्या नॉन-मेकअप लूकवर मोकळे सोडलेले केस फारच शोधून दिसत होते.

मनसोक्त डान्स अन् सेलिब्रिटींची उपस्थिती

आज कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधनामध्ये अडकले. जवळचे काही मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडला. सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम पार पडला. मेहंदी आणि संगीतच्या वेळी कियारा आणि सिद्धार्थने मनसोक्तपणे डान्स केला. करण जोहर, जुही चावला, शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मिरा राजपूत, शबीना खान, अंबानी कुटुंबीय या लग्नाच्या निमित्ताने व्हीआयपी पाहुणे म्हणून सध्या जैलमेरमध्ये आहेत.