मुंबई : सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या लग्नाची योजना उघड केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या केमिस्ट्रीची ऑनस्क्रीनपासून ऑफ स्क्रीनपर्यंत चर्चा आहे. शेरशाह या चित्रपटातही सिद्धार्थ आणि कियाराची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघं खऱ्या आयुष्यातही डेट करत असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान, सिद्धार्थने अद्याप असा कोणताही प्लॅन नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने सांगितलं की, सध्या त्याचा लग्नाचा कोणताही विचार नाही. यासोबतच सिद्धार्थ म्हणाला की, लग्न झाल्यावर सर्वांना कळेलच.
कियारा अडवाणीने यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा इंडस्ट्रीतील तिचा सगळ्यात जवळचा मित्र असल्याचं सांगितलं होतं. 'शेरशाह'मध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केल्याचं सिद्धार्थने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होतं. पण त्याआधीही आम्ही अनेकदा भेटलो होतो.
सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तो थँक गॉडचं शूटिंग करत आहे. ज्यामध्ये तो अजय देवगण आणि रकुल प्रीतसोबत दिसणार आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थने रोहित शेट्टीसोबत एक प्रोजेक्टही साइन केला आहे.