Sidharth Shukla सोबत त्या रात्री नक्की काय घडलं? Hindustani Bhau चा व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा

हिंदुस्थानी भाऊने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या काही तास आधी काय घडले हे या व्हिडीओत सांगितले आहे.

Updated: Sep 5, 2021, 02:47 PM IST
Sidharth Shukla सोबत त्या रात्री नक्की काय घडलं? Hindustani Bhau चा व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा title=

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनामुळे केवळ त्याचे जवळचे आणि त्याचे प्रियजनच अस्वस्थ झाले नाहीत, तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला यामुळे धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे बऱ्यात लोकांना त्याच्या जाण्यावर विश्वास बसत नाही आहे. बिग बॉस 13 स्पर्धक विकास पाठक, जे हिंदुस्तानी भाऊ म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तो सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याच्या घरी आईचे सांत्वन करण्यासाठी पोहोचला.

हिंदुस्थानी भाऊ सिद्धार्थच्या आईच्या भेटीला

मीडियासोबत केलेल्या बातचीतचा व्हिडीओ पापाराझी व्हायरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला आहे. हिंदुस्थानी भाऊने (Hindustani Bhau)  सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या काही तास आधी काय घडले हे या व्हिडीओत सांगितले आहे. हिंदुस्थानी भाऊंनी सिद्धार्थ शुक्लाची आई रीता यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे माध्यमांसोबत या गोष्टी शेअर केल्या. यामध्ये त्याने सिद्धार्थने 1-2 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री काय केले ते सांगितले आहे.

हिंदुस्थानी भाऊंनी त्या रात्रीची गोष्ट सांगितली

तो म्हणाला, 'सर्व काही ठीक होते, सिदने (सिद्धार्थ शुक्ला) रात्रीचे जेवण केले आणि तो झोपला. 3:30 वाजता त्याने त्याच्या आईला एक ग्लास थंड पाणी आणण्यासाठी सांगितले कारण त्याला अस्वस्थ वाटत होते, मर त्याच्या आईने ही त्याला पाणी दिले. नंतर त्याने आईस्क्रीम देखील खाल्ले आणि तो झोपायला गेला.

सिद्धार्थ दररोज सकाळी 10 च्या सुमारास जिमसाठी उठायचा, पण त्या दिवशी म्हणजे 2 तारखेला सकाळी अलार्म वाजला तरी सिद्धार्थ 10:00 पर्यंत उठला नाही, म्हणून मग त्याची आई त्याच्या खोलीत गेली. तेव्हा सिद्धार्थबद्दल कळाले.

हिंदुस्थानी भाऊ 'बिग बॉस 13' मध्ये सिद्धार्थसोबत दिसला होता.

आम्ही तुम्हाला सांगू, सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यामुळे शोक व्यक्त करत हिंदुस्तानी भाऊंने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'RIP मित्रा.' हिंदुस्थानी भाऊ 'बिग बॉस 13' चा एक भाग होता. परंतु शो दरम्यान त्याचे सिद्धार्थसोबत फारचे चांगले संबंध नव्हते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2 सप्टेंबरला सिद्धार्थ शुक्लचे निधन

लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि 'बिग बॉस 13' विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (2 सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ शुक्ला हा फक्त 40 वर्षांचा होता.