मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालचा चेहरा अजूनही चाहत्यांच्या मनात आहे. सिमीला 'द लेडी इन व्हाइट' असं म्हणतात. सिमीचे लाखो चाहते आहेत. मात्र, त्या वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांच्या शेजारच्या महाराजांवर मनापासून प्रेम करत होत्या
एका मुलाखतीमध्ये सिमी ग्रेवाल म्हणाल्या, ''वयाच्या 17 व्या वर्षी मी जामनगरमधील माझ्या शेजारच्या महाराजांवर मनापासून प्रेम केलं होतं. चढ-उतार पाहत आलेलं हे अफेअर जवळपास तीन वर्षे चाललं. या अफेअपमध्ये मी प्राण्यांचं जग पाहिलं. आज मी जेव्हा मागे वळून बघते. तेव्हा स्माईल करते.. आता मला समजलं की, कुणावर मालकिणीचा हक्क गाजवला तर रेलेशनशिप खराब होऊ शकतं''
रवि मोहनशी केलं लग्न
त्यानंतर सिमीने दिल्लीत चुन्नामल घराण्याच्या रविमोहन यांच्याशी लग्न केलं. हे लग्न फक्त तीन वर्षे टिकलं. सिमी म्हणाली, 'आम्ही दोघंही चांगले आहोत पण आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नव्हतो. सिमीच्या म्हणण्यानुसार, ''आम्ही वेगवेगळे रहायला सुरुवात केली आणि मग घटस्फोटही घेतला. चांगली गोष्ट अशी होती की आमच्यात, कोणत्याही तक्रारी नव्हत्या. मी अजूनही त्याच्या कुटूंबाच्या अगदी जवळ आहे.'
मूल नसल्याचा पश्चात्ताप
सिमी ग्रेवाल म्हणाल्या, 'माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत म्हणजे मला मुलं नाहीत. मी एकेवेळी मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मी एका अनाथाश्रमात गेले जिथे मला विजया नावाची एक मुलगी सापडली, तिच्या कुटुंबीयांनी तिला रेल्वे स्थानकात सोडले होतं '
सिमी सांगतात, "नियमानुसार मला तिचे फोटो वृत्तपत्रात छापून घ्यायचे होते. मी तसं केलंही, मात्र तीन महिने कुणीही मुलीच्या हक्कांवर दावा केला नाही.मग जशी मी त्या मुलीला ताब्यात घेणार होते, तेवढ्याच तिचे आईवडील आले. मग माझे मन तुटलं.'