Singer Talks About Sexual Intercourse And Sex Education: पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवताना (Sexual Intercourse) महिलांच्या गुप्तांगामधून रक्तस्त्राव झाला नाही किंवा तिला शरीरसंबंध ठेवताना वेदना झाला झाल्या नाहीत तर ती व्हर्जीन नसते का? या विषयावरुन गायिका चिन्मयी श्रीपादने (Singer Chinmayi Sripada) उघडपणे आपलं मत मांडलं आहे. आपले विचार उघडपणे व्यक्त करणारी कलाकार म्हणून चिन्मयीकडे पाहिलं जातं. तिनेच या विषयावरुन भाष्य करणारं एक रिल शेअर केलं आहे. महिलांना मिळणाऱ्या शरीरसुखाबद्दल बोलताना लोकांनी शरीरसंबंधांबद्दल पॉर्न व्हिडीओमधून प्रेरणा घेऊ नये अशी विनंती चिन्मयी श्रीपादने केली आहे. पॉर्नमध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टी या फारच त्रासदायक आणि चुकीच्या असतात असं या गायिकेनं म्हटलं आहे.
चिन्मयीने शेअर केलेल्या माहितीपूर्ण व्हिडीओमध्ये ती 'व्हजायनिसमस' प्रक्रियेबद्दल बोलताना दिसत आहे. त्याआधी चिन्मयीने या व्हिडीओमध्ये व्हायरल व्हिडीओ मीम शेअर केलं आहे. नवविवाहित लोकासंदर्भातील विधान करताना या व्हिडीओमध्ये एका अरुंद मार्गावरुन मोठ्या आकाराची गाडी चालताना दिसत आहे. हे द्विअर्थाचं अश्लील स्वरुपाचं मीम शेअर करुन चिन्मयीने यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. "जर शरीरसंबंध ठेवताना महिलेला त्रास होत असेल तर ही गोष्ट सामन्य नाही. योनीही पूर्णपणे लुब्रिकेटेड असणं आवश्यक असतं. म्हणजेच त्या महिलेला तितकं उत्तेजित करणं आवश्यक आहे. जर तिची योनी पूर्णपणे लुब्रिकेट झालेली नसेल (संभोग करण्यासाठी आवश्यक ओलावा योनीमध्ये नैसर्गिकरित्या निर्माण झाला नसेल) तर त्याचा अर्थ ती महिला पूर्णपणे उत्तेजित झालेली नाही किंवा ती शरीरसंबंध ठेवण्यासाठी तयार नाही असा होतो," असं चिन्मयी सांगताना दिसत आहे.
तसेच शरीरसंबंध ठेवल्यानंतर महिलांना रक्तस्त्राव होत असेल आणि त्याचं पुरुषांकडून कौतुक होत असेल तर हे चुकीचं असल्याचंही चिन्मयीने म्हटलं असून अशी विचारसणीच मोठा अडथळा आहे असंही ती सांगते. मात्र त्याचवेळी चिन्मयी ही पूर्णपणे मुलांची चूक नाही कारण त्यांना या कल्पना पॉर्नमधून किंवा इतर लोकांकडून मिळतात ज्यांना स्वत:ला शरीरसंबंधांबद्दल पूर्णपणे चुकीची माहिती असते, असंही म्हटलं आहे.
"सेक्ससंदर्भातील माहिती पॉर्न किंवा पॉर्नोग्राफिक चित्रपटांमधून घेऊ नका. त्यापैकी अनेक व्हिडीओमधील व्यक्ती स्वत:ला इजा करुन घेतात आणि पॉर्न पाहण्याचं व्यसन लागणं ही देखील मोठी समस्या आहे. या समस्येसंदर्भात मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. त्यामुळेच कृपा महिलांचं शरीर आणि महिलांना शरीरसुखामधून मिळणाऱ्या आनंदाबद्दलच्या चुकीच्या कल्पनांवर, गोष्टींवर विश्वास ठेऊ नका," असं आवाहन चिन्मयीने केलं आहे.
"अनेकदा मुली अशा विषयांवर संवाद साधण्याबद्दल कम्फर्टेबल नसतात. मात्र अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये पुस्तकं, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुलभूत माहिती मिळवता येईल. मी तुमच्याबरोबर सहमत आहे. मीम्स बनवणाऱ्या पेजेसने महिलांबद्दलचे असे नकारात्मक रिल्स शेअर बनवताना संयम राखला पाहिजे," असं एकीने या व्हिडीओवर कमेंट करुन म्हटलं आहे. अनेकांनी चिन्मयीने हा विषय चर्चेसाठी आणल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे.