मौनी रॉयसोबत या प्रसिद्ध गायकाचा किसींग सीन देण्यास नकार

मौनी रॉय बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Updated: Sep 25, 2021, 08:17 PM IST
मौनी रॉयसोबत या प्रसिद्ध गायकाचा किसींग सीन देण्यास नकार title=

मुंबई : मौनी रॉय बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. यात काहीच शंका नाही. प्रत्येक अभिनेत्याला तिच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करायचा असतो. मात्र हे खरंच सत्य आहे का? अलीकडेच, गायक जुबिन नौटियालने अभिनेत्रीला आगामी म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी किस करण्यास नकार दिला.

जुबिन रोमान्स सीन्स देण्यास ठिक होता. मात्र किसींग सीन देण्यासाठी ठाम नव्हता. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नौटियाल आणि मौनी रॉय पहिल्यांदाच 'दिल गलती कर बैठा है' या गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

जुबिनला वाटलं प्रँन्क आहे
जुबिनला शूटिंग दरम्यान सांगण्यात आलं की, त्याचा पुढचा सीन मौनीला किस करायचा आहे. सुरुवातीला गायकाला वाटलं की क्रू त्याची मस्करी करत आहेत. मात्र काही मिनिटांनंतर जेव्हा प्रत्येकाने सांगितलं की, हा प्रँन्क नाही आणि हे सत्य आहे. तेव्हा त्याने तसं करण्यास नकार दिला.

काय म्हणाली मौनी?
जुबिनच्या या प्रतिक्रियेनंतर मौनीने म्हटलं की, ती देखील त्याला किस करू इच्छित नाही. जुबिन ताबडतोब मौनीकडे गेला आणि तिला वैयक्तिकरित्या न घेण्यास सांगितलं. मात्र, हा प्रत्यक्षात एक प्रँन्क होता. या प्रँम्कचं टार्गेट जुबिन होता आणि मौनीने तिची भूमिका उत्तम प्रकारे बजावली होती.