AP Dhillon Injured: गायक एपी ढिल्लन गंभीर जखमी रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाला...

AP Dhillon नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. 

Updated: Nov 7, 2022, 06:45 PM IST
AP Dhillon Injured: गायक एपी ढिल्लन गंभीर जखमी रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाला... title=

AP Dhillon hospitalised after sustaining injury on US tour​: काल 1 नोव्हेंबरला सकाळी जिथे बॉलिवूड अभिनेत्री रंभाच्या अपघाताच्या बातमीनं चाहते घाबरले होते, तिथे आता गायक आणि रॅपर एपी धिल्लन (Singer Rapper Ap Dhillon) जखमी झाल्याच्या बातमीने चाहते तणावात आहेत. एपी ढिल्लनने त्याच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. त्याला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एपी ढिल्लनला या अवस्थेत पाहून चाहते नाराज झाले आहेत आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

आणखी वाचा : क्षुल्लक खेळामुळे गायकाला गमवावा लागला जीव; ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

AP Dhillon ला ही दुखापत कशी झाली याबाबत सध्या काहीही माहिती नाही. पण एपी ढिल्लननं नुकतेच सांगितले की, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर त्याला दुखापत झाली. त्यामुळे लॉस एंजेलिसमधील एपी ढिल्लन यांच्या सर्व कॉन्सर्ट रद्द करण्यात आले आहेत. एपी ढिल्लननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. एपी ढिल्लननं सांगितले की आता काही दिवस तो परफॉर्म करू शकणार नाही. (Singer Rapper Ap Dhillon Injured Admitted In Hospital shares post Shows Get Cancelled For Now Fans Praying For His Recovery) 

Singer Rapper Ap Dhillon Injured Admitted In Hospital shares post Shows Get Cancelled For Now Fans Praying For His Recovery

AP Dhillon नं हा रुग्णालयातील हा फोटो शेअर करत लिहिले की, 'कॅलिफोर्नियातील माझ्या सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो... SF आणि LA मधील माझे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत हे सांगताना माझं मन दुखावलं जात आहे. टूर दरम्यान मला अचानक दुखापत झाली, गंभीर दुखापती झाल्या आहेत. यामुळे मी परफॉर्म करू शकणार नाही. मी आता ठीक आहे आणि लवकरच पूर्ण बरा होईन. पण आता मी परफॉर्म करू शकत नाही. तुम्हा सर्वांना भेटायला मी खूप उत्सुक होतो. पण तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे. मी तुम्हाला काही आठवड्यांनी भेटेन. तुमची तिकिटे तुमच्याकडे ठेवा. ते नवीन शेड्यूल केलेल्या शोसाठी व्हॅलिड राहतील.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एपी ढिल्लनचे पूर्ण नाव अमृतपाल सिंह ढिल्लन आहे. एपी ढिल्लनचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्याची गाणी चांगलीच पसंत केली जातात. एपी ढिल्लन हा इंडो-कॅनेडियन गायक, रॅपर आणि गीतकार आहे. सारा अली खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर आणि जान्हवी कपूर हे देखील एपी ढिल्लनचे चाहते आहेत.