तस्कराला डेट करायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! धमकी देत म्हणाला- ‘तुझ्या मुलीचे पाय सूटकेसमध्ये…’

Smriti Khanna : स्मृती खन्नानं तिच्या Vlog मध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे की पहिला पती हा स्मगलर होता तर एक्सनं तिच्या आईला दिली होती धमकी. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 31, 2024, 01:55 PM IST
तस्कराला डेट करायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! धमकी देत म्हणाला- ‘तुझ्या मुलीचे पाय सूटकेसमध्ये…’ title=
(Photo Credit : Social Media)

Smriti Khanna : 'मेरी आशिकी तुम से ही' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मृती खन्नाला लोकप्रियता मिळाली आहे. 2017 मध्ये स्मृतीनं सहकलाकार गौतम गुप्ताशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून ती 3 वर्षांची आहे. स्मृति सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेक व्लॉग देखील शेअर करताना दिसते. दरम्यान, आता स्मृतीनं तिच्या सुरुवातिच्या काळातील काही गोष्टींचे धक्कादायक खुलासे केले आहेत. यात तिचं पहिलं लग्न आणि तिच्या रिलेशनशिपविषयी खुलासे केले आहेत. 

स्मृतीनं खुलासा केला की 'शाळा संपल्यानंतर मी कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होती. 5 वर्ष त्या व्यक्तीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आम्ही लग्न केलं होतं. हे माझं पहिलं लग्न होतं. मात्र, माझं ते वैवाहिक आयुष्य काही चांगलं नव्हतं आणि काही महिन्यांमध्येच आमचं नातं तुटलं.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्मृतिनं सांगितलं की 'तो मुलगा जे मला वाटलं होतं त्याहून वेगळा निघाला. मी त्याच्याविषयी जो काही विचार करायची, तो तसा नव्हता. मला मुर्ख बवण्यात आलं होतं. माझ्या संपूर्ण कुटुंबाला मुर्ख बनवण्यात आलं होतं. त्या माणसाचा अनेक अवैध धंद्यांमध्ये हात होता. मी खूप काही सहन केलंय. त्यावेळी मी 22-23 वर्षांची होती. त्याच्यासोबत माझ्या आयुष्यातील 5-6 वर्षे ही खोट्यात किंवा धोक्यात गेली. मी हे सांगायला हवं की नाही हे माझ्या लक्षात येत नाही आहे, मात्र तो स्मगलर होता. त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरु होत्या. ज्या तो माझ्यापासून लपवत होता. सुरुवातीला त्यानं काही सांगितलं नाही. मात्र, जेव्हा आमचं लग्न झालं. त्यानं माझ्यासोबत विचित्र वागणूक सुरु केली. त्यानं सांगितलं की काही अडचणी आहेत. आपण मोठ्या अडचणीत अडकू शकतो. माझे काही शत्रु देखील आहेत. या गोष्टीचा मला खूप अपमान वाटू लागला होता आणि मी काही केलं नाही. यातच काही महिने निघाले. जेव्हा त्याच्या विरोधात अॅक्शन घेतली तेव्हा कळलं की तो धोकेबाज आहे. आई-वडिलांनी यातून बाहेर निघण्यासाठी मला खूप मदत केली'.

मुंबईत कामाला आल्यानंतर पुन्हा एकदा आली रिलेशनशिपमध्ये आणि तो माणुस एका सायको होता असं स्मृतिचं म्हणणं आहे. तर त्यानं तिच्या आईला धमकी दिली होती की जर मुलगी हवी असेल, तर तिला दिल्लीला घेऊन जा नाही तर मुलीचे पाय सुटकेसमध्ये मिळतील. ज्या मुलासोबत स्मृति रिलेशनशिपमध्ये आली होती. त्यानं तिला सगळ्या गोष्टींसाठी निर्बंध लावण्यास सुरुवात केली. तो देखील गुंड निघाला. तो सायको होता असं तिचं म्हणणं आहे. त्यानं माफी मागितली आणि तुम्ही ती स्विकार केली नाही तर तो मारायचा असं तिनं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अंकिता लोखंडेचा पतिसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत कोजी डान्स, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना आली सासुबाईंची आठवण

पुढे स्मृतिनं सांगितलं की 'त्यानं मला सांगितलं की जर तुला माझ्यासोबत रहायचं नाही तर मुंबई सोड. तो मोठा गुंड होता. तो लोकांची फसवणूक करायचा. एकदा त्याला अशी फसवणूक करताना पडकण्यात आलं, त्यानंतर त्यानं माझ्या आईला खूप काही सुनावलं. त्यानं माझी आईला सांगितलं की जर तुम्हाला तुमची मुलगी सिंगल पीसमध्ये हवी असेल, तर तिला परत तुमच्यासोबत घेऊन जा. नाही तर, मी तिचे पाट तोडेन आणि सूटकेसमध्ये बंद करून पाठवेन. तिला माझ्यासोबत रहायचं नाही ना. यापुढे ती मुंबईत दिसायला नको.'