Snehal Rai Accident: ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकेतील अभिनेत्री स्नेहल राय हिचा अपघात झाला आहे. स्नेहल ही पुण्याला जात असताना तिच्या कारला एका ट्रकनं जोरदार स्पिडनं येत धडक दिली. त्यामुळे तिच्या कारचं बंपर आणि मडगार्डचं नुकसान झालं आहे. खरंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या ड्रायव्हरता गाडीवरून ताबा सुटला नाही आणि तो त्याच दिशेनं गाडी चालवत राहिला की तो स्नेहलला वाचवू शकेल. या प्रसंगी कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. तिचा ड्रायव्हर आणि तिला कारमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, जेव्हा स्नेहलनं त्या ट्रक ड्रायव्हरकडे भरपाई मागितली तेव्हा त्यानं थेट नकार दिला. इतकंच काय तर त्यानं धमकी दिली आणि नंतर गायब झाला. हे पाहता स्नेहलनं जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.
याविषयी सांगताना स्नेहल म्हणाली, “मला अजून हे कळत नाही आहे की नक्की माझ्यासोबत काय झालं. अचानक एक ट्रक आला आणि माझ्या कारला धडकला. माझ्या ड्रायव्हरचे आभार की त्याने माझा जीव वाचवला. आम्ही पोलिसांना कॉल केला आणि 5 ते 10 मिनिटांत तिथे पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनमधील योगेश भोसले यांनी खूप मदत केली. अपघातानंतर मी खूप घाबरले होते, त्यांनी मला ग्लुकोज दिले आणि आवश्यक ती मदत केली."
स्नेहल पुढे म्हणाली, "पोलीस वेळेवर येत नाहीत असे लोक का म्हणतात ते मला कळत नाही. आजच्या काळात, ते घटनास्थळी येतात आणि आवश्यक ते सर्व करतात. स्नेहल पुढ म्हणाली, ट्रक ड्रायव्हर पळून गेल्याने आणि त्याच्या वाहनाबद्दल कोणतीही माहिती नसल्याने तिला एफआयआर नोंदवता आला नाही. घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले.
स्नेहलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत ती आती सुखरुप असून काही झालेलं नाही असं सांगितलं आहे, तर स्नेहल ही मंत्री माधवेंद्र राय यांची पत्नी आहे.
हेही वाचा : Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचं ठिकाण ठरलं मग! पाहून म्हणाल केवढा तो खर्च...!
या आधी अनेकांचे असे अपघात झाले आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील आहे. मलायका एक शूट करून पुण्याहून मुंबईला परतत होती. त्यावेळी तिचा रस्त्यावर एक अपघात झाला होता. हा अपघात झाल्यानंतर तिच्यावर याचा खूप वाईट परिणाम झाला होता. त्यानंतर मलायका चक्क गाडी चालवायला देखील घाबरू लागली होती. तिचा अपघात झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी तिथे रुग्णालयात सगळ्यात आधी अरबाज खान पोहोचला होता.