नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर Sobhita Dhulipala ने अखेर सोडलं मौन, म्हणाली 'मी स्वतःला...'

Sobhita Dhulipala on Dating Rumours : समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या आणि शोभिता धूलीपालाच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शोभिता आणि नागा चैतन्यला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आता शोभितानं रिलेशनशिपच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2023, 07:15 PM IST
नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर Sobhita Dhulipala ने अखेर सोडलं मौन, म्हणाली 'मी स्वतःला...' title=
(Photo Credit : Social Media)

Sobhita Dhulipala on Dating Rumours : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा लोकप्रिय कलाकार आहे. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला. त्यांच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्यचं नाव ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातील अभिनेत्री शोभिता धूलीपालाशी जोडण्यात आलं. त्या दोघांना बऱ्याच वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं. इतकंच काय तर त्यांचे ट्रिपचे अनेक फोटो देखील समोर आले होते. मात्र, आता शोभितानं या गोष्टीचा उच्चार न करता त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

‘पीएस 2’ च्या प्रेस स्क्रीनिंगदरम्यान डेटिंगबद्दल प्रश्न विचारताच शोभिता म्हणाली, 'मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला खूप चांगल्या चित्रपटांमध्ये काम  करण्याची संधी मिळाली. मी एक क्लासिकल डान्सर आहे आणि मला डान्स करायला खूप आवडतं. मणिरत्नम यांच्या चित्रपटात एआर रहमान यांच्या 3 गाण्यांवर डान्स करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी आता माझा या नव्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले आहे. जे लोक माझ्याबद्दल कोणतीही माहिती न घेता बोलतात, त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. मी काही चुकीचं करत नाही त्यामुळे गोष्टी स्पष्ट करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही.  लोक अर्धवट माहिती घेत माझ्याबद्दल लिहितात त्या गोष्टींना उत्तर देणं किंवा स्पष्टीकरण देणं हे माझं काम नाही, प्रत्येकानं आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ते सुधारलं पाहिजे, आणि शांत राहून एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाची बातमी दिल्यानंतर, शोभिता आणि नागाच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मिशेलिन स्टार शेफ सुरेंदर मोहनसोबत त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हे दोघे लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याची बातमी समोर आली होती. फोटोमध्ये शोभिता मागे बसलेली दिसत आहे. मात्र, त्या दोघांनी या बातमीवर दुजोरा दिलेला नाही.  

हेही वाचा : 'मॅडम जरा वजन कमी करा...', सल्ला देणाऱ्या पत्रकाराला Vidya Balanचं सडेतोड उत्तर

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्य त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समंथा विषयी बोलला की 'समांथाही एक चांगली मुलगी आहे आणि जगातली सगळी सुखे मिळण्यासाठी ती पात्र आहे. पण आम्हाला अनेकदा आमच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले जातात त्यामुळे आमच्यात एक संकोच निर्माण होतो. आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे आणि या प्रश्नांमुळे कुठे तरी त्याला धक्का पोहोचतो. याचे मला खूप दुःख होते.'