'मॅडम जरा वजन कमी करा...', सल्ला देणाऱ्या पत्रकाराला Vidya Balanचं सडेतोड उत्तर

Vidya Balan नं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की कशा प्रकारे तिच्या वाढत्या वजनावर लोक कमेंट करतात आणि तिला वजन कमी करण्यास सांगतात. इतकंच काय तर लग्नाला 11 वर्षे होऊनही आई होण्याचा विचार का केला नाही या प्रश्नावर देखील विद्यानं उत्तर दिलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2023, 06:31 PM IST
'मॅडम जरा वजन कमी करा...', सल्ला देणाऱ्या पत्रकाराला Vidya Balanचं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Vidya Balan : बॉलिवूडल अभिनेत्री विद्या बालन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या बालननं आजवर अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. विद्यानं बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे. विद्या ही जितकी तिच्या बोल्डनेस साठी ओळखली जाते तितकीच तिच्या अभिनयासाठी देखील ओळखली जाते. बऱ्याचवेळा आपण विद्याला पारंपरिक भारतीय लूकमध्ये पाहतो. पण विद्याचं वाढत वजन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. विद्याच्या वाढत्या वजनामुळे तिला एकदा नाही तर अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. एकदा चक्क एका पत्रकारानं विद्याचं वाढत वजन पाहता तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. 

विद्या बालननं छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेतून विद्यानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. पण आज विद्याला तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 2017 साली विद्याचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या अनेक मुलाखती देत होती. या मुलाखतीं दरम्यान, एका पत्रकारानं विद्याला तिचं वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्या पत्रकारानं विद्याला सांगितलं की ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी तिनं वजन कमी करायला हवं. त्यावर विद्यानं पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्या पत्रकाराला खडे बोल सुनवत विद्या म्हणाली, मी जे काही करत आहे त्यात मी खूप आनंदी आहे, तुमच्या विचारांमध्ये बदल झाला तर ते खूप चांगलं होईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : The Kerala Story ला मराठी कलाकार का प्रमोट करत नाही? Amruta Khanvilkar ने एका वाक्यात उत्तर दिलं

विद्याला तिच्या वजनावरून ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी विद्याला तिच्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. 'जेव्हा मी 17 वर्षांची होते, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं होतं की, जर मी दिवसातून 10 लिटर पाणी प्यायले तर माझं वजन कमी होईल. त्यानंतर मी रोज 10 लिटर पाणी पिऊ लागले. पण जास्त पाणी प्यायल्याने जवळपास रोज रात्री मला उलटी व्हायची. माझ्या कुटुंबाला माझी चिंता होऊ लागली होती आणि मी काय करते हे जेव्हा मी त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले आणि ते मला खूप ओरडले. त्यानंतर जेव्हा मी 10 लिटर पाणी पिणं बंद केलं तेव्हा पुन्हा माझं वजन वाढलं.'