'मी काही खाल्लं तर...'; करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीनं नवऱ्यावरच उगारला हात?

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal First Karwa Chauth : सोनाक्षी सिन्हानं करवा चौथच्याच दिवशी नवरा झहीर इकबालवर उगारला हात

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2024, 03:28 PM IST
'मी काही खाल्लं तर...'; करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीनं नवऱ्यावरच उगारला हात?
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal First Karwa Chauth : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा झहीर इक्बाल यांनी याचवर्षी जून महिन्यात कोर्टात लग्न केलं. लग्नाच्या दिवसांपासून दोघं चर्चेत आहेत. ते दोघं सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. करवा चौथच्या निमित्तानं सोनाक्षीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी ती झहीरवर हात उगारताना दिसते. या व्हिडीओमुळे सोनाक्षीनं सांगितलं की करवा चौथचा उपवास ठेवला. हे असं सांगत असताना असं काही तरी होतं की ती झहीरवर हात उगारते.

Add Zee News as a Preferred Source

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाक्षी सिन्हा ही विचित्र गोष्टी करताना दिसते. तिनं करवा चौथसाठी उपवास ठेवला, पण तिला भूक सहन होत नव्हती. तर तिनं फुलांपासून बनवण्यात आलेली एक जाळी तिच्या डोक्यावर ठेवते. झहीर तिच्या या वागण्यावरून तिची खिल्ली उडवतो. यावर ती बोलते की 'मला भूक लागली आहे. मला माहित नाही की मी काय करु' आणि मग दोघं हसू लागतात. त्यानंतर सोनाक्षी सिन्हा जहीला विचारते. 'तुला भूक लागलेली नाही?' झहीर बोलतो 'नाही.' मग सोनाक्षी पुढे त्याला विचारते की 'तू उपाशी का आहेस? कारण मी करवा चौथचा उपवास ठेवला आहे? तू करवा चौथचा उपवास का ठेवला आहेस?' यावर झहीर इकबाल मस्करीत उत्तर देत म्हणाला की 'जर मी काही खाल्ल तर तू माझा जीव घेशील.' तर सोनाश्री सीरियस होते आणि बोलते की, 'अच्छा त्यामुळे तू उपवास ठेवला.' झहीर इकबाल हसतो आणि मग सोनाक्षी सिन्हा झहीरला तिच्या कोपरनं मारते. त्यानंतर हा व्हिडीओ संपतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : टाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'

या विनोदी व्हिडीओला शेअर करत सोनाक्षीनं कॅप्शन दिलं की एक असा नवरा शोधा जो तुम्हाला एकट्याला उपाशी ठेवणार नाही... मग काहीही कारण असो... करवा चौथच्या खूप शुभेच्छा. आमची पहिली करवा चौथ. सोनाक्षीनं हा व्हिडीओ शेअर करत हसतानाचा आणि लाल हार्टचं इमोटिकॉन शेअर केलं आहे. 

About the Author