टाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'

Govinda on Neelam Kothari : नीलमला भेटल्यानंतर गोविंदाला झाला विवाहित असण्याचा पश्चाताप! पत्नी सुनीताला सांगायचा नीलमसारखी हो

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2024, 01:48 PM IST
टाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'
(Photo Credit : Social Media)

Govinda on Neelam Kothari : बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत राहायचं. एकीकडे तो चित्रपटसृष्टीत स्वत: चं स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न करत होता तर दुसरीकडे त्यानं गुपचूप गर्लफ्रेंड सुनीताशी लग्न केलं. त्याच्या काही काळानंतर त्याला अभिनेत्री नीलमवर प्रेम झालं. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की सतत सुनीताला तिच्यासारखं होण्यास सांगत होता. याविषयी स्वत: गोविंदानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो त्याच्या पत्नीला घेऊन खूप निर्दयी झाला होता. 

Add Zee News as a Preferred Source

गोविंदा आणि नीलमनं 'इल्जाम', 'फर्ज की जून', 'लव 86' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्याच दरम्यान, गोविंदाला नीलमवर प्रेम झालं. याविषयी 1990 ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदानं सांगितलं की 'मी सतत तिची (नीलम)ची तारिफ करायचो. इतकंच नाही तर सुनीतासमोर देखील तिची स्तुती करायचो. मी सुनीताशी म्हणायचे की तिनं स्वत: ला बदलून नीलमसारखं रहायला हवं. सुनीताला सांगायचो की तिनं नीलमकडून शिकावं. मी निर्दयी होतो. सुनीता चिडायची. ती मला सांगायची की मी जे काही आहे त्यामुळे तुला माझ्यावर प्रेम झालं, त्यामुळे मला बदलण्याचा कधी प्रयत्न करु नकोस. त्यावेळी मला कळत नव्हतं की माझ्याकडे काय आहे.' 

गोविंदानं नीलमविषयी सांगितलं की ती अशी होती की कुणीही तिच्या प्रेमात वेडं होईल आणि मलाही तिच्यावर प्रेम झालं होतं. पण तोपर्यंत सुनीता आणि गोविंदा रिलेशनशिपमध्ये आले होते. त्यानं हे मान्य केलं की त्याचं सुनीतासोबत इतकं सीरियस नात्यात राहण्याचा कधी विचार नव्हता. तो फक्त फिरायला मज्जा करायला एका मुलीच्या शोधात होता आणि तेव्हाच त्याला सुनीता भेटली. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येणं हा माझा प्लॅन होता हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी मोठी किंमत मोजली आहे. त्यानं सांगितलं की जेव्हा तो नीलमला भेटला त्या आधीच त्याचं आणि सुनीताचं लग्न झालं होतं आणि त्याचं नुकसान हे झालेलं होतं. 

हेही वाचा : नॉन व्हेजमुळे झाला नीलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'

दरम्यान, गोविंदा आणि सुनीताच्या लग्नाला आता 35 वर्ष झाली आहेत आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नीलमनं अभिनेता समीर सोनीशी लग्न केलं असून त्यांना एक मुलगी देखील आहे.

About the Author