मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानी बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. सिनेमाला चाहत्यांनी तुफान डोक्यावर घेतलं. सलमान खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्यांचं मोठं फॅन फॉलोविंग आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. पण अशात सलमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे.
काही दिवसांपूर्वी सोनाक्षी आणि सलमानच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये सलमान वर तर सोनाक्षी वधूच्या कपड्यांमध्ये दिसली. पण ते फोटो खरे नसून इडिट करुन बनवण्यात आलेले आहेत. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
पण रंगणाऱ्या सर्व चर्चांना सोनाक्षीने पूर्णविराम लावला आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, 'तुम्हाला खरे फोटो आणि इडिट केलेल्या फोटोंमधील अंतर कळत नाही का?' सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान आणि सोनाक्षी सध्या एकत्र दुबईत आहेत. पण ते 'दबंग द टूर रिलोडेड' या इव्हेंटसाठी एकत्र गेले आहेत. त्यामुळे ही केवळ एक अफवा आहे. सलमानचे चाहते अभिनेत्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे फोटो व्हायरल केले जात असल्याचं बोललं जात आहे.