बाळासाठी बुरुज उतरणारी धाडसी 'हिरकणी' साकारणार 'ही' अभिनेत्री

सिनेमातील शिवराज्याभिषेकाचं गाणं लोकप्रिय 

Updated: Sep 25, 2019, 01:49 PM IST
बाळासाठी बुरुज उतरणारी धाडसी 'हिरकणी' साकारणार 'ही' अभिनेत्री title=

मुंबई : 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर दिग्दर्शक प्रसाद ओक 'हिरकणी' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. मंगळवारीच या सिनेमातील हिरकणी प्रेक्षकांसमोर आली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारत आहे. 

काही दिवसांपूर्वी या सिनेमातील शिवराज्याभिषेकावरील एक गाणे लाँच झाले. आतापर्यंत आपण शिवराज्याभिषेकावरील अनेक गाणी ऐकली पण हे गाणं या सगळ्यांपेक्षा वेगळे आणि भव्यदिव्य आहे यात शंका नाही. 'हिरकणी'मध्ये 9 कलाकार आणि 6 लोककलेच्या मदतीने हे 'शिवराज्याभिषेक गीत'सादर करण्यात आलं आहे. 

या सिनेमात चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग आणि राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे दिसत आहेत.