''माझे कपडे कुठे आहेत'' अभिनेत्री सोनम कपूरचा सोशल मीडियावर प्रश्न

 बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे.

Updated: Apr 20, 2022, 08:09 PM IST
''माझे कपडे कुठे आहेत'' अभिनेत्री सोनम कपूरचा सोशल मीडियावर प्रश्न title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. आता तिला तिची जवळची मैत्रीण आणि सेलिब्रिटी डिझायनर मसाबा गुप्ताकडून तिच्या मातृत्वाचे कपडे डिझाइन करायचे आहेत. तिने सोशल मीडियावर मसाबाला याबद्दल विचारलं आणि मसाबाने तिच्या मैत्रिणीला चोख उत्तरही दिलं.

सोनमने मंगळवारी मसाबाच्या वोग मासिकाचं फ्रंटपेज शेअर केलं. यावंर सोनमनं लिहिलं की, ''मसाबा गुप्ता ही आतापर्यंतची महाग आणि सेलिब्रिटी डिझायनर आहे. मी तिच्यावर प्रेम करते ती सर्वोत्कृष्ट आहे." यानंतर सोनम कपूरने मसाबाच्या वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शनमध्ये लिहीलं की, "तिच्या शरीराकडे पहा. काय कसरत आहे."

मसाबाचं कौतुक केल्यानंतर सोनमनं तिला विचारलं की, ''तिने अजून माझ्या बेबी बंपचे कपडे देखील बनवलेले नाहीत. मी आता तिची वाट पाहू शकत नाही. म्हणूनच मी तिला जाहीरपणे विचारत आहे. मसाबा गुप्ता माझे कपडे कुठे आहेत?"

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मसाबाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सोनमची पोस्ट पुन्हा पोस्ट केली आणि लिहिले, "जीसस, टेक द वील फ्रॉम आवर लेडी सोनम".. सोनम आणि मसाबा लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा सोनम आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या पहिल्या गर्भधारणेची घोषणा केली तेव्हा मसाबा म्हणाली की अभिनेत्री एक महान आई बनेल.