Sonam Kapoor च्या विसरभोळेपणाचं Pro Max उदाहरण पाहून पतीची अशी रिअॅक्शन

Sonam Kapoor नं तिच्या पतीसोबत फोटो शेअर करत त्याला Wedding Anniversary च्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Dec 5, 2022, 02:56 PM IST
Sonam Kapoor च्या विसरभोळेपणाचं Pro Max उदाहरण पाहून पतीची अशी रिअॅक्शन title=

Sonam Kapoor Forgets Wedding Anniversary : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लेक अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनमही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोनमनं बिझनेसमॅन आनंद आहूजाशी (Anand Ahuja) लग्न केलं आहे. त्या दोघांच्या आयुष्यात एका पाहुण्याचे आगमन झाले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वायु असे ठेवले. दरम्यान, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की आई झाल्यानंतर सोनम सगळं विसरुन गेली आहे. सोनम तिच्या लग्नाची वेडिंग अॅनिव्हर्सरी विसरून गेली आहे. खरंतर सोनमनं नुकतीच अॅनिव्हर्सरी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमनं पती आनंदसोबत एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, या फोटोवर कमेंट करत आनंद आहूजानं सोनमला त्यांची आज अॅनिव्हर्सरी नसल्याची आठवण करून दिली. 

सोनमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमनं पती आनंदसोबत एक थ्रोबॅक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सोनमनं कॅप्शन दिलं की तुझी तुलना कोणाशीही होऊ शकत नाही... आणि मी तुला मिस करते. आपल्याला एकत्र 7 वर्षे पूर्ण झाली. सोनमनं शेअर केलेली पोस्ट पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले.

हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये हे काय बोलून गेला Manasi Naik चा पती, एकदा पाहाच

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनमनं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण सगळ्यां कमेंट्स पेक्षा सगळ्यांचे लक्ष हे सोनमचा पती आनंदच्या कमेंटनं वेधले आहे. सोनमच्या पोस्टवर कमेंट करत आनंद म्हणाला, 'सोना. मे महिन्यात सात वर्षे होतील... आपण पहिल्या डेटपासून मोजायला सुरूवात करू ना..? तेव्हापासून नाही जेव्हापासून आपण फोनवर बोलायला लागलो...' या पोस्टमुळे सोनमचा तारखांच्या बाबतीत गोंधळ झाला असे कळले आहे. 

पाहा काय म्हणाला आनंद आहुजा

sonam kapoor forgets wedding anniversary date husband anand ahuja gives funny reply

सोनम आणि आनंद हे 8 मे 2018 रोजी लग्न बंधनात अडकले. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोनम आणि आनंद लग्न बंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. (sonam kapoor forgets wedding anniversary date husband anand ahuja gives funny reply)