मुंबई : यंदा बॉलिवूडमधल्या सोनम कपूरने अचानक लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला. सोनमने बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन आनंद अहुजासोबत लग्न केलं. सोनम कायमच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सजग राहिली आहे. ती कायम आपलं खाजगी आयुष्य सगळ्यांपासून लांब ठेवते. मात्र मे महिन्यांत लग्न झाल्यावर हे आयुष्य खाजगी राहिलेलं नाही. कारण या लग्नाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. सोनमच्या लग्नात तिच्या चुलत भावंडांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी भरपूर धम्माल केली. याचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर सोनम कपूर कान्स फेस्टिव्हलला गेली. आणि मग आपल्या वीरे दी वेडिंग या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाली.
एका मुलाखतीत सोनम कपूरने आनंदसोबतच्या पहिल्या भेटीपासून ते अगदी पहिल्या डेटपर्यंतच्या सर्व आठवणी शेअर केल्या आहेत. वोग मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीत सोनम कपूरने सांगितले की, सुरूवातीला तिने आनंदशी फेसबुक आणि स्नॅपचॅटवर बोलायला सुरूवात केली. त्याचप्रमाणे सोनमने आपल्या विदाईचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंत सोनम, आनंद आणि राणी मुखर्जी देखील दिसत आहे. याबाबतची आठवण शेअर करताना सोनम म्हणाली की, या दिवसांत आनंदने मला भरपूर समजून घेतलं. मी लग्नाच्या दोन दिवसानंतरच कान्समध्ये जाणार होती. त्यानंतर सिनेमाच्या प्रमोशनकरता बिझी असणार आहे तेव्हा कोणताही वाद न करता त्याने ही गोष्ट समजून घेतली.
सोनमने आपल्या पहिली डेटबद्दलची आठवण देखील शेअर केली आहे. जेव्हा मी पहिल्यांदा आनंदला भेटायला गेले तेव्हा मी सगळ्यात साथे स्नीकर्स घातले होते. तेव्हा मी त्याला बोलले की, माझे सर्वात बेकार स्नीकर्स बघूनही तू माझ्या प्रेमात पडला. तेव्हा लंडनमध्ये आनंदशी बोलताना मला लक्षात आलं की, हेच माझं प्रेम आहे.