मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. येथे सोनम लॉरियाल पॅरिस इंडियाचे प्रतिनिधत्व करत आहे आणि यासाठी ती १४ आणि १५ मे ला कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली.
सोनमच्या लग्नानंतर ती पहिल्यांदाचा रेड कार्पेटवर अवतरत आहे. सोनमने कान्सच्या पहिल्या दिवशी राल्फ अॅँड रुसोचा लेहंगा परिधान केला होता.
तर दुसऱ्या दिवशी वेरा वांगच्या २०१९ च्या ब्राईडल कलेक्शनमधील न्यूड गाऊनला पसंती दिली. या गाऊनमध्ये सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.
कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची ही सोनमची ८ वी वेळ होती आणि दरवर्षी सोनमचे स्टायलिंग तिची बहिण रियाचं करते.
मात्र यावेळी वीरे दी वेडींगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने ती सोनमसह कान्समध्ये सहभागी होऊ शकली नाही.
या फेस्टिवलनंतर सोनम लवकरच वीरे दी वेडिंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार आहे.