ग्रहण मालिकेत पाहायला मिळणार हा ट्विस्ट

कुणाचा जाणार बळी 

ग्रहण मालिकेत पाहायला मिळणार हा ट्विस्ट

मुंबई : वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ग्रहण ही मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येत नाही आणि प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहतात. कथेतील गूढता आणि रहस्य तसेच ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीन्सला खिळवून ठेवण्यात मालिका यशस्वी झाली आहे. प्रेक्षकांच्या अखंड प्रेम आणि पाठिंब्यामुळे ग्रहण या मालिकेने नुकतेच यशश्वी अर्धशतक गाठले. ५० व्या भागात मात्र प्रेक्षकांना मालिकेत एक खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

सध्या ग्रहण ही मालिका अगदी मनोरंजक वळणावर अली आहे. रमामुळे आजूबाजूला सर्व अघटित घाटना घडतात म्हणून तिला निरंजनपासून दूर सिद्धार्थच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. रमा ही संपूर्णपणे मंगलसारखी वागते आणि त्यामुळे निरंजन रमामध्ये मंगलला शोधत असतो. इकडे सिद्धार्थचा साखरपुडा तोंडावर येऊन ठेपलेला असताना तो आजारी पडतो. त्यांचा साखरपुड्यात काहीतरी विघ्न येणार याची चाहूल सिद्धार्थची होणारी बायको प्रियांकाला आधीपासून लागलेली असते आणि ही भीती सत्य परिस्थितीत बदलते.

साखरपुड्याच्या दिवशी प्रियांका आणि सिद्धार्थ एकमेकांना अंगठी घालणार इतक्यातच सिद्धार्थला हॉस्पिटलमधून फोन येतो. त्याच्या हॉस्पिटलचा स्टाफ त्याला सांगतो की निरंजन हॉस्पिटलमध्ये रमाला भेटायला आला आहे. सिद्धार्थ तडक हॉस्पिटलकडे जातो पण तो परंत निरंजनचा मृत्यू होतो. आता निरंजनचा मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या याचं रहस्य मात्र कायम आहे. रमानेच तर निरंजनचा बळी नसेल घेतला? निरंजनचा बळी घेण्यामागे रमाचा काय हेतू असेल? निरांजनाच्या मृत्यूमागे दुसरं कोण तर नसेल ना? सिद्धार्थ आणि प्रियांकाच्या साखरपुड्याच्या आलेलं हे विघ्न पुढेही परत येईल का? हे प्रेक्षकांना येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल.