close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आलिया भट्टच्या आईने केला 'हा' मोठा खुलासा

आलिया गर्भात असताना सोनी राजदान यांना सिगारेटचे व्यसन लागले होते. 

Updated: Jul 11, 2019, 09:22 PM IST
आलिया भट्टच्या आईने केला 'हा' मोठा खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असतात. त्यांनी नुकताच एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला. आलिया गर्भात असताना सोनी यांना सिगारेटचे व्यसन लागले होते. 

 

B'day SPL: एक्ट्रेस सोनी राजदान के साथ नहीं रहती स्टार बेटी आलिया, जानें क्या है वजह

त्यावेळी सोनी राजदान महेश भट्ट यांच्या गुमराह चित्रपटाचे शुटिंग करत होत्या. मात्र, त्यावेळी सोनी राजदान यांना आपण गर्भवती असल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी नकळतपणे बऱ्याच सिगरेट ओढल्याचे सोनी राजदान यांनी सांगितले. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर सोनी राजदान यांनी जाहीरपणे या चुकीची कबुली दिली आहे. 

सोनी राजदान सध्या झी ५ वरील 'युअर्स ट्रुली' या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि महेश भट्ट यांनीदेखील अभिनय केला होता.