सोनू निगमने मुरगळला चाहत्याचा हात

वातावण बिघडण्याच्या आधी सोनूने चालाकीने हाताळली परिस्थिती.

Updated: Jan 21, 2019, 03:42 PM IST
सोनू निगमने मुरगळला चाहत्याचा हात

मुंबई: सोनू निगम उत्तम गायकच नसुन त्याची विनोद बुध्दिही कमालीची आहे. सोशल मीडियावर सोनू निगमच्या कामाचे लाखो व्हिडिओ मिळतील. एकेकाळी सोनू निगम रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालनाचे काम करायचे. त्याने केलेली कॉमेडी प्रेक्षकांना फार आवडत असे. सोनू निगमचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका कार्यक्रमातला आहे. कार्यक्रमात चाहता सोनू निगमसोबत सेल्फी काढण्यासाठी आला पण सोनू पुढे निघूण जात होता. चालता-चालता चाहता सोनू निगमसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने 
सोनू निगमच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोनूने खांद्यावरून हात काढून चाहत्याचा हात जोरात मुरगळला. वातावण बिघडण्याच्या आधी सोनूने चालाकीने चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवत सेल्फी काढला.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hahaha love this!! Sonu Nigam is defo on point with this selfie!! Scenes from an art event earlier this week FOLLOW voompla INQUIRIES  ppbakshi . #voompla #bollywood #sonunigam #bollywoodstyle #bollywoodfashion #mumbaidiaries #delhidiaries #funtyms #selfietym #fullmasti #indianactress #bollywoodactress #bollywoodactresses

A post shared by Voompla (@voompla) on

घडल्या प्रकारानंतर सोनूने चाहत्यांसोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या. सोनूच्या कृत्याची चर्चा बराचवेळ चालू होती. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. सोनू नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर केलेल्या वक्तव्यामुळे प्रसारमाध्यमांवर टीका केली होती.