मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी लोकं अडकली होती. काम नसल्यामुळे अनेक जण आपल्या गावाकडे निघाली. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं. अशा वेळेस अभिनेता सोनू सूदने लोकांची भरपूर मदत केली. आज वेगवेगळ्या माध्यमातून ही तो अशीच लोकांनी मदत करत आहे. त्याने केलेल्या या कामाची आता वैश्विक स्तरावर ही दखल घेतली जात आहे. सोनू सूदची यंदाच्या ग्लोबल एशियन सेलिब्रिटी म्हणून निवड झाली आहे. या यादीमध्ये त्याची प्रियांका चोप्रा, अरमान मलिक आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत शर्यत होती.
कोरोना कोळात प्रत्येकजण सावधगिरीने आपल्या घराची काळजी घेत होते. पण सोनू सूद लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना मदत करताना दिसला. त्याने बरेच कामगारांना आपल्या घरी पोहोचवलं. परदेशात अडकलेल्या लोकांना ही त्याने मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतात येण्याची व्यवस्था केली. या व्यतिरिक्त त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि गोरगरीबांच्या सुरक्षिततेसारख्या गोष्टींचीही काळजी घेतली. आता या सर्व गोष्टींमुळे त्याची ग्लोबल एशियन सेलिब्रिटी म्हणून निवड झाली आह
इस्टर्न आय नावाच्या ब्रिटनमधील पोर्टलने ही यादी जाहीर केली आहे यावर सोनू सूद म्हणाला की, 'माझ्या प्रयत्नांचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद ईस्टर्न आय.' जेव्हा कोरोनाव्हायरस देशभर पसरला. तेव्हा देशवासीयांची सेवा करणे हा माझा धर्म आणि माझे कर्तव्य आहे हे मला जाणवले. माझ्या आतून एक आवाज आला. यासाठीच मी मुंबईत आलो आहे. म्हणूनच मी जे केले ते माझे भारतीय म्हणून कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत ते करत राहीन.'
ग्लोबल एशियन सेलिब्रिटी २०२० ची टॉप टेन यादी खालीलप्रमाणे आहे:
सोनू सूद, लीली सिंह, चार्ली, देव पटेल, अरमान मलिक, प्रियांका चोप्रा, प्रभास, मिंडी कलिंग, सुरभी चंदना आणि कुमारी नानजियानी.
याशिवाय टॉप ५० मध्ये आयुष्मान खुराना, दिलजीत दोसांज, शहनाज गिल, अमिताभ बच्चन, पंकज त्रिपाठी, मसाबा गुप्ता, ध्वनी भानुशाली, हेली शाह आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश आहे.