Sonu Soodच्या भाचीने केली मामाकडे आईविरूद्ध तक्रार; व्हिडिओ व्हायरल

भाच्यांचा  लाडका मामा सोनू सूद 

Updated: May 17, 2021, 10:30 AM IST
Sonu Soodच्या भाचीने केली मामाकडे आईविरूद्ध तक्रार; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कोरोना काळात अभिनेता सोनू सूद सर्वांच्या मदतीसाठी धावत आहे. चित्रपटांमध्ये खलनायक असलेला हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र सर्वांचा हिरो झाला आहे. आता तर सोनू सूदच्या भाचीने तिच्या आईची तक्रार केली आहे. मामा सोनूने देखील भाचीची तक्रार ऐकून तिच्या अडचणींचं निवारण केलं आहे. माम आणि भाची नायराचा हा संवाद  सोनूने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोनूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'माझी भाची नायरला एक समस्या आहे. तिची आई तिचा लिंका पिते. तिच्या ताटातून चिकन देखील खाते. मला असं वाटतं आपण सर्वांना हा अनुभव नक्कीचं आला असेल.' असं लिहिलं आहे. नायरा आणि सोनूचा हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस पडत आहे. 

सोनूला  भाचा आणि भाची देखील आहे. काही दिवसांपूर्वी दोघांना एका जाहिरातीमध्ये कास्ट करण्यात आलं होतं. सूदची बहीण मालविका सच्चरही वारंवार नायराचे गोंडस व्हिडिओ पोस्ट करते. चाहत्यांना देखील नायराचे व्हिडिओ आवडतात.