लॉकडाऊन | लाखो गरिबांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं अनुभवांवर पुस्तक

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन काळात देशावर संकट ओढवलं असताना लाखो मजुर बेरोजगार झाले. अशा 

Updated: Dec 28, 2020, 08:29 PM IST
लॉकडाऊन | लाखो गरिबांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं अनुभवांवर पुस्तक title=

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन काळात देशावर संकट ओढवलं असताना लाखो मजुर बेरोजगार झाले. अशा विपरीत परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात पुढे केला. अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान लोकांची मदत करताना आलेले विविध अनुभव सोनू एका पुस्तकाच्या रुपाने देशवासीयांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. ‘आय एम नॉट मसिहा’ असं या पुस्तकाचं नाव आहे. 

सोनू सूदचं हे नवं पुस्तक वाचकांच्या भेटीस आलंय. नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालं. लक्षवेधी बाब म्हणजे हे पुस्तक अॅमेझॉन आणि किंडल सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.

अभिनेता अमित साद, अभिनेत्री सई मांजरेकरनं आदी कलाकारांनी या पुस्तकासाठी सोनूला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना काळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव सोनू सुदने या पुस्तकातून सांगितले आहेत. या पुस्तकाचं कव्हर पेज त्याने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे.