करचोरीबाबत सोनू सूदची प्रतिक्रिया, 'माझ्या कमाईतील एक एक रूपया...'

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करचोरीप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे

Updated: Sep 21, 2021, 02:11 PM IST
करचोरीबाबत सोनू सूदची प्रतिक्रिया, 'माझ्या कमाईतील एक एक रूपया...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद करचोरीप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आयकर विभागाने सोनूवर 20 कोटी रूपयांचं कर चुकवल्याप्रकरणी कारवाई केली आहे. पण आता याप्रकरणी सोनूने मौन सोडलं आहे. नुकताच एका मुलाखतीत सोनूने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'मी काही चुकीचं केलं नाही. मला राज्यसभेच्या जागेसाठी ऑफरही दोनदा मिळाली. असा मोठा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केला आहे. मुलाखतीमुळे देखील सोनू चर्चेत आला. 

सोनू म्हणाला, 'मी कोणताही कायदा मोडला नाही. तरीही, कर अधिकाऱ्यांनी सलग 4 दिवस माझी चौकशी केली. त्या चौकशीत त्यांनी जे काही प्रश्न विचारले, मी त्यांना अचूक उत्तरे दिली, त्यांना हवे ते कागदपत्र मी दिले. मला दोन पक्षांकडून राज्यसभेच्या जागेच्या ऑफर आल्या आहेत.' पण मी त्या ऑफर नाकारल्या असल्याचं देखील सोनूने सांगितलं आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे सोनू म्हणाला की, मी माझे काम केले आणि त्यांनी त्यांचे काम केले. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांची उत्तरं मी पुराव्यासोबत दिले आहेत आणि हे माझे कर्तव्य देखील आहे.' असं सोनूने सांगितलं आहे. शिवाय माझं काम सुरूचं राहील असं म्हणत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

सोनू सूदचे आर्थिक रेकोर्ड, उत्पन्न, अकाउंट बुक, खर्चाशी संबंधित डेटाची छाननी केली सोनूच्या घरी छापेमारी सुरू असल्यामुळे आम आदमी पार्टी नाराजी  व्यक्त केली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोनूला पाठिंबा दर्शविला आहे.