माधुरीचं हे रुप पाहून तुम्हीही म्हणाल, 'उफ्फ तेरी अदा.... '

वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं....

Updated: Sep 21, 2021, 01:47 PM IST
माधुरीचं हे रुप पाहून तुम्हीही म्हणाल, 'उफ्फ तेरी अदा.... '

मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं आहे. सौंदर्यासोबतचं देवाने तिला भेट म्हणून नृत्य कलेचं वरदान दिलं आहे. माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक मुली माधुरी सारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. फक्त मुलचं नाही तर माधुरीच्या सौंदर्याने मुली देखील घायाळ होतात. 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्या मनात घर करणारी माधुरी आजही लोकप्रिय आहे.

माधुरीने सोशल मीडियावर साडीतील काही फोटो पोस्ट केले  आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने पती आणि डॉ. श्रीराम नेने प्रति प्रेम व्यक्त केलं आहे. फोटो पोस्ट करत माधुरीने कॅप्शनमध्ये, 'फूल माँगूँ ना बहार माँगूँ, मैं तो सनम तेरा प्यार माँगूँ ....' असं लिहिलं आहे. सध्या माधुरीची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निळ्या रंगाच्या साडीमध्ये माधुरी प्रचंड सुंदर दिसत आहे. माधुरी दीक्षित डान्सिंग स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. माधुरी दीक्षितची स्टाईल तिच्या फॅन्सना नेहमी आवडते.आपल्या डान्स आणि अभिनयामुळे ती असंख्य तरुणांसाठी आदर्श ठरली आहे.