अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याघरी दिग्गज कलाकारांची हजेरी, पाहा काय होतं कारण

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातील अनेक कलाकारा 2 वर्षानंतर भेटले. जवळपास 30 कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती.

Updated: Nov 15, 2022, 08:34 PM IST
अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याघरी दिग्गज कलाकारांची हजेरी, पाहा काय होतं कारण title=

Get-Together Party: बॉलिवूडचे अनेक स्टार्स मुंबईत एकत्र आले होते. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या मुंबईतील घरी या रियुनियन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला 80 च्या दशकातील स्टार्सने हजेरी लावली. बॉलीवूडपासून ते दक्षिणेपर्यंत अनेक स्टार्स यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या घरी पोहोचले होते.

गेट टुगेदर पार्टीमध्ये महिलांसाठी सिल्व्हर, ऑरेंज कलरचा ड्रेसकोड होता, तर पुरुष कलाकारांसाठी ग्रे, ऑरेंज कलरचा ड्रेस कोड निश्चित करण्यात आला होता. यावेळी या कलाकारांनी अनेक खेळ खेळले. विशेष म्हणजे या पार्टीत पाहुण्यांसाठी खास महाराष्ट्रीयन जेवण ठेवण्यात आले होते.

सुपरस्टार चिरंजीवी, व्यंकटेश, खुशबू, शोभना, रेवती, मीनाक्षी शेषाद्री, सुहासिनी मणिरत्नम, टीना अंबानी आणि मधु यांनी जॅकी श्रॉफ आणि पूनम ढिल्लन यांनी आयोजित केलेल्या 11व्या रीयुनियन पार्टीला हजेरी लावली. तर अनुपम खेर, अनिल कपूर, राज बब्बर, विद्या बालन, सनी देओल, संजय दत्त यांसारखे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते.

Class of 80s: Mohanlal, Chiranjeevi, Jackie Shroff, Jaya Prada And Other Top Stars Pose For a Viral Photo

कोरोनामुळे हे कलाकार गेले 2 वर्ष एकत्र आले नव्हते. पण 2 वर्षानंतर या पार्टीचं पुन्हा आयोजन करण्यात आलं. या पार्टीला 30 हून अधिक स्टार्स उपस्थित होते. याआधी 2019 मध्ये चिरंजीवी यांच्या घरी 10वी रीयुनियन पार्टी आयोजित केली गेली होती.