South Indian Actress Angry Vow Not To Work With This Actor: दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या तलापती विजयच्या 'लियो' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाने तिकीटबारीवर विक्रमी कामगिरी केली आहे. केवळ तलापती विजयचे चाहतेच नाही तर अनेक समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटामधील प्रमुख अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आहे.
तृषा कृष्णनने दाक्षिणात्य अभिनेते मंसूर अली खान यांनी आपल्याबद्दल 'नीच आणि घृणास्पद पद्धतीने' भाष्य केलं आहे असं म्हणत टीका केली आहे. इतक्यावरच तृषा थांबलेली नाही तर यापुढे आयुष्यात कधीच आपण मंजूर अली खान यांच्याबरोबर काम करणार नाही अशी शपथही तिने खाल्ली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी तृषाची बाजू उचलून धरत दाक्षिणात्य अभिनेते मंजूर अली खान यांना झापलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मंसूर यांनी एका मुलाखतीमध्ये कथित पद्धतीने, 'जेव्हा मला तृषा माझ्याबरोबर अभिनय करत आहे असं समजलं. तेव्हा एक बेडरुम सीन हवा असं मला वाटलं. मी तिला बेडरुममध्ये तशाच पद्धतीने नेलं असतं जसं (सीनमध्ये) मी ठरवलं होतं,' असं विधान केलं. यावर 'लिओ'च्या दिग्दर्शकानेही नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. आता अभिनेत्री तृषा कृष्णननेही संताप व्यक्त केला आहे.
The thing about men like Mansoor Ali Khan - they have always been talking like this. Never been condemned, with other men in power, money and influence laughing along; eeyy aamaa da macha correct ra maccha sorta thing. Robo Shankar said something on how he wants allowed to touch… pic.twitter.com/ZkRb2qxmMl
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) November 18, 2023
तृषाने तिच्याबद्दल मंसूर यांच्याकडून करण्यात आलेल्या विधानावर सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. तृषाने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया देताना, "नुकताच एक व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला. यामध्ये मंसूर अली खान माझ्याबद्दल फार घाणेरडी आणि घृणास्पद विधानं करताना दिसत आहेत. मी या विधानांची कठोर शब्दांमध्ये निंदा करते. ही विधानं लैंगिक भेदभाव करणारी, अपमानकारक, स्त्रियांचा द्वेष करणारी, घृणास्पद आणि घाणेरडी आहेत. ते इच्छा व्यक्त करु शकतात मात्र मी आभारी आहे की मी त्याच्यासारख्या वाईट व्यक्तीबरोबर कधी स्क्रीन स्पेस शेअर केली नाही. तसेच मी हे सुद्धा सुनिच्छित करु इच्छिते की भविष्यातही माझ्या कोणत्याही चित्रपटामध्ये असं होणार नाही. अशा लोकांमुळे सर्वांचेच नाव खराब होतं," असं म्हटलं.
A recent video has come to my notice where Mr.Mansoor Ali Khan has spoken about me in a vile and disgusting manner.I strongly condemn this and find it sexist,disrespectful,misogynistic,repulsive and in bad taste.He can keep wishing but I am grateful never to have shared screen…
— Trish (@trishtrashers) November 18, 2023
सध्या या प्रकरणावरुन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये मोठा वाद सुरु असतानाच आता तृषाने पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य केलं आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.