नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथमध्येही नागराजच्या सिनेमाची चर्चा 

Updated: Mar 3, 2022, 11:23 AM IST
 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO  title=

मुंबई :  अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू अशी तगडी स्टारकास्ट घेऊन दिग्दर्शक नागराज मंजुळे 'झुंड' सिनेमा घेऊन सज्ज आहे. ४ मार्च रोजी नागराजचा झुंड सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा साऊथमधील सुपरस्टार धनुषला दाखवण्यात आला. नागराजचा हा सिनेमा बघून धनुष पूर्णपणे भारावला आहे. त्याचा हा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप जबरदस्त आहे. 

धनुष 'झुंड' पाहून भारावला... 

हा तर मास्टरपिस आहे, असं म्हणत धनुषने एका शब्दात सिनेमाच कौतुक केलं आहे. 'मला कळत नाहिये मी काय बोलू, पण खूप छान आहे हा सिनेमा. या सिनेमातील संदेश खूप महत्वाचं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

मी या सिनेमातील हजारपेक्षा जास्त चांगल्या टेक्निकल गोष्टी सांगू शकतो. हा सिनेमा प्रत्येकाना पाहावा. या पाहण्याचा अनुभव  प्रत्येकानं घ्यावा. हा मास्टरपीस आहे. हा सिनेमा अनेकांचे लक्ष वेधणार यात शंकाच नाही.

झुंड पाहिल्यावर मला खूप आनंद झाला.  सिनेमातील सगळ्या कलाकारांचं कौतुक त्यांनी मन जिंकल आहे. अमिताभ बच्चन तुम्ही खूपच छान काम केले आहे.

पूर्ण टीमनं चांगलं काम केले आहे. नागराजचे मी आभार मानतो त्याने एवढा चांगला सिनेमा तयार केला. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो.'

झुंड हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात फुटबॉल कोच ही भूमिका साकारणार आहेत. 

आमिरने या शब्दात केलं सिनेमाचं कौतुक 

माझ्याकडे काही शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी...तू जो भारतातील तरूणाईच्या भावना ज्या समजून घेतल्यास ना, त्याचं विशेष कौतुक आहे. 

सिनेमात ज्या मुलांनी काम केलंय. त्याचं देखील विशेष कौतुक. काय सिनेमा बनवला आहे यार? Fantastic.. खूपच युनिक सिनेमा आहे. जी स्पिरिट तुम्ही कॅच केलंय ते लॉजिकने येत नाही.

सिनेमाचा एंड रिझल्ट असा आहे की, मी स्पिरिट घेऊन उठतो. हा सिनेमा मला शेवटपर्यंत सोडत नाही. 

एवढ्यावरच आमिर खान थांबला नाही. पुढे तो म्हणतो की, आम्ही जे ३० ते ४० वर्षांत जे केलंय. त्या सगळ्याचा 'फुटबॉल' केलंय.