अभिनेता प्रभासला मोठा धक्का! 10 मिलअन फॉलोअर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटसोबत झालं असं काही...

Actor Prabhas Instagram Account:अभिनेता प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान प्रभासने त्याचे खाते स्वताहून डिअॅक्टीव्ह केले आहे की  खाते खरोखर हॅक झाले आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Pravin Dabholkar | Updated: Oct 15, 2023, 01:39 PM IST
अभिनेता प्रभासला मोठा धक्का! 10 मिलअन फॉलोअर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटसोबत झालं असं काही... title=

Actor Prabhas Instagram Account: साऊथचा मेगा स्टार प्रभास आणि त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता प्रभास सोशल मीडियामुळे अडचणीत आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेता प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान प्रभासने त्याचे खाते स्वताहून डिअॅक्टीव्ह केले आहे की  खाते खरोखर हॅक झाले आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार, प्रभासचे अकाउंट इंस्टाग्राम  प्लॅटफॉर्मवर दिसायचे बंद झाले आहे. त्यामुळे सुपरस्टारचे अकाउंट हॅक झाले असावे असा अंदाज फॅन्स करत आहेत. असे असले तरी प्रभासने स्वतःच त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केले आहे का? असा प्रश्नदेखील चाहते विचारत आहेत.

सुपरस्टार प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट दिसत नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली आहे. नक्की काय प्रकरण काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे माध्यमांमध्ये चर्चा होऊनदेखील यावर प्रभासकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

South superstar Prabhas Instagram Account Hack Marathi News

प्रभासचे अकाउंट हॅक झाले आहे का? किंवा स्वत: प्रभासने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिवेट केले आहे? हे 2 प्रश्न प्रभासच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. 

प्रभासचे इंस्टाग्रामवर 10.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रभासच्या प्रत्येक अपडेटकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. अशावेळी इंस्टाग्राम अकाऊंट हॅकींगत्या या बातमीमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत. दुसरीकडे, जर प्रभासने स्वतःच त्याचे अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले असेल तर नक्कीच चाहत्यांची मनं तुटतील, कारण हे या प्लॅटफॉर्मवरुन प्रभास आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. 

चाहते इंस्टाग्रामच्या माध्यमातून आवडत्या सुपरस्टारबद्दल अपडेट राहतात आणि वेळोवेळी चाहते प्रभासशी संपर्क करुन आपले प्रेम व्यक्त करत असतात. प्रभासकडून काही सूचना मिळेपर्यंत याबद्दल सांगता येणे कठीण आहे.