सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर

याबद्दल आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. "माझे गुरु हे चित्रपटात झळकणार, खूपच छान", अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. 

Updated: Jan 18, 2024, 08:31 PM IST
सद्गुरुंची थेट हॉलिवूडमध्ये एंट्री? चित्रपटाचा ट्रेलरही आला समोर title=

Sadhguru in Hollywood Movie : जगप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेनिफर ही लवकरच 'दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तिने नुकताच शेअर केला आहे. जेनिफरच्या आगामी चित्रपटात योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरु झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

जेनिफर लोपेझ ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर 'दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेम, रोमान्स आणि ट्रॅजेडी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना तिने त्याला छान कॅप्शन दिले आहे. यात तिने या चित्रपटाबद्दल सांगितले आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना तिने यातील कलाकारांना टॅग केले आहे. यात फॅट जोए, ट्रेव्हर नोहा, सोफिया व्हर्गारा, जेनिफर लॅव्हिस, जय शेट्टी, नील डीग्रास टायसन, सद्गुरु, टॉनी बेलीसीमो, ड्रेक हॉग, ट्रेव्हर जॅक्सन, पॉल रसी, बेला ग्लॅनो यांसारखे अनेक कलाकर झळकणार आहेत. जेनिफर लोपेझने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सद्गुरु यांना टॅग केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jennifer Lopez (@jlo)

योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरु हे दिस इज मी नाऊ: अ लव्ह स्टोरी अशी चर्चा रंगली आहे. या चित्रपटाद्वारे ते सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. जेनिफरने याबद्दल उल्लेख केला असला तरी हे खरं की खोटं याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबद्दल आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. "माझे गुरु हे चित्रपटात झळकणार, खूपच छान", अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एकाने मला असं वाटतंय की "या चित्रपटात ते मोटारसायकल चालवत असावेत किंवा एखादी हटके गोष्ट करत असावेत", अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने "हे खरं आहे का", असे विचारले आहे. 

दरम्यान या चित्रपटात अभिनेत्री जेनिफर लोपेझ ही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिने या चित्रपटाचे सहलेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन कोण करतंय याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सध्या सर्वत्र याच्या ट्रेलरची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.