मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईमध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बरीच कारणं पुढे आली.
श्रीदेवी या त्यांच्या कुटुंबासोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या अंत्यदर्शनाला त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. ५० वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवी यांनी खूप प्रसिद्धी आणि मान मिळवला.
एक दिवस 'हिम्मतवाला' (1983) च्या शूटिंग दरम्यान संजय दत्त अचानक श्रीदेवी यांच्या हॉटेलमधील खोलीत येऊन पोहचला आणि जोरजोरात दार ठोकू लागला. जेव्हा श्रीदेवी यांनी दरवाजा उघडला तेव्हा संजय दत्तला दारुच्या नशेत पाहून श्रीदेवी घाबरल्या. संजय अशाच स्थितीत श्रीदेवींच्या रुममध्ये गेला.
संजय दत्त श्रीदेवींचा मोठा फॅन होता. त्याला जेव्हा माहिती पडलं की श्रीदेवी 'हिम्मतवाला'च्या शूटिंग करत आहे. तेव्हा लगेचच संजय जत्त श्रीदेवींना भेटण्यासाठी पोहोचला. त्यावेळी संजय दत्त खूप ड्रिंक करत होता. अशाच स्थितीत तो श्रीदेवींना भेटण्यासाठी पोहोचल्याने श्रीदेवी खूप घाबरल्या.
संजय दत्तने एका इंटरव्यूमध्ये म्हटलं की, श्रीदेवींच्या खोलीत जाऊन मी काय केलं, काय बोललो हे मला आठवत नाही. पण यानतंर श्रीदेवी खूप घाबरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी संजय दत्त यांना पाहून दरवाजा बंद करुन घेतला होता. संजय दत्तची श्रीदेवींशी ही पहिली भेट होती. पण ही पहिली भेट अशी होती की यामुळे श्रीदेवींनी कधीच संजय दत्तसोबत काम न करण्याचं ठरवलं होतं.