दुबई : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे.
यूएईच्या खलीज टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांचा मृत्यू हद्यविकाराने झाला आहे. अजून पार्थिव मात्र परिवाराला सोपवण्यात आलेलं नाहीसूत्रांच्या माहितीनुसार दुबई पोलिसांनी याबाबत पुष्टी केली आहे की, श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दुबईमध्ये फॉरेंसिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं आहे की, अजून अंतिम फॉरेंसिक रिपोर्ट तयार झालेला नाही. फॉरेंसिक विभागाने भारतीय राजदुतांना याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्ट कधी पर्यंत तयार होईल याबाबत अजून काहीही सांगता येणार नाही. श्रीदेवी यांचं निधन होऊन 38 तास झाले आहेत.
- पोस्टमार्टमनंतर आता रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
- पार्थिवावर रासायनिक लेप लावला जाणार आहे.
- यासाठी 90 मिनिटं लागतात
- पोलिसांकडून मृत्यु प्रमाणपत्रांची प्रतिक्षा
- पार्थिव सोपवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेलाही वेळ लागणार
- भारतीय दूतावासाच्या काही प्रक्रियेला लागणार थोडा वेळ
- त्यानंतर चार्टर प्लेनने पार्थिव मुंबईला आणणार