श्रीदेवींच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी होळी पार्टी केली रद्द

शनिवारी रात्री बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2018, 02:36 PM IST
श्रीदेवींच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी होळी पार्टी केली रद्द title=

मुंबई : शनिवारी रात्री बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी यानंतर होळी पार्टी रद्द केली आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना श्रीदेवींच्या अचानक जाण्याने चांगलाच धक्का बसला आहे.

श्रीदेवी यांच्या निधनामुळे 2 मार्चला जानकी कुटीर येथे होणारी होळी पार्टी रद्द केली आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. 

श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली आहे.