'तिच्यासाठी आता...', मुलीची सुटका होताच रियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

हे सारं पाहिल्यानंत...   

Updated: Oct 8, 2020, 04:13 PM IST
'तिच्यासाठी आता...', मुलीची सुटका होताच रियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty हिला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. ज्यानंतर तब्बल २९ दिवसांनी रियाची सुटका झाली. अभिनेता आणि प्रियकर, sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी जोडून तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणात रियाला ताब्यात घेण्यात आलं होतं. आपल्या मुलीला या प्रसंगांचा समाना करावा लागल्यानंतर आता सुटका झाल्यावर रियाच्या कुटुंबीयांची आणि विशेषत: तिच्या आईनं दिलेली प्रतिक्रिया समोर आली आहे.

रियाची आई, संध्या चक्रवर्ती यांनी एका वळणावर आपण आत्महत्या करण्याचाही विचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. आपल्या दोन्ही मुलांना कारावास झाल्यामुळं रियाच्या आईनं खाण्यापिण्याकडे तर लक्ष नव्हतंच पण, त्या नीट झोपूही शकत नव्हत्या. 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

'तिनं ज्या परिस्थितीचा सामना केला आहे, हे पाहता आता ती यातून कशी सावरेल?', असा प्रश्न उपस्थित करत आपली मुलगी एक योद्धा आहे, त्यामुळं ती हा प्रसंगही निभावून नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात रियाला या धक्क्यातून सावरण्यासाठी थेरेपी आणि इतरही काही पद्धतींची आपण मदत घेणार असल्याचं त्या म्हणाल्या. 

रियानं घरी परतल्यानंतर आपल्या आईवडिलांना धीर देत त्यांनाही या प्रसंगी धीट राहण्यास सांगितलं. आपल्या मुलीला त्रास होत असतानाही तिनं आपल्या मनाचा मोठेपणा गमावलेला नाही, हे तिच्या आईनं न विसरता सांगितलं. 'तुम्ही उदास का दिसत आहात, तुम्हाला धीट राहायचं आहे. लढा द्यायचा आहे', असं रिया घरी परतताच तिच्या कुटुंबीयांना म्हणाली. 

 

एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्ती हिला जामीन मंजूर झाल्यानंतर जेलमधून बाहेर येणाऱ्या रियाची गाडी कोणीही फॉलो करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. असे केल्याच कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.