ही आहे 'स्टुडंट ऑफ दी इयर 2'ची स्टार कास्ट

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दी इयर या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची स्टार कास्ट समोर आलीये. 

Updated: Apr 11, 2018, 03:22 PM IST
ही आहे 'स्टुडंट ऑफ दी इयर 2'ची स्टार कास्ट title=

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दी इयर या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची स्टार कास्ट समोर आलीये. करणने ट्विट करुन ही माहिती दिली. या स्टार कास्टचे स्टुडंट ऑफ दी इयर २मध्ये अॅडमिशन झाले असल्याचे करणने ट्विटरवर म्हटलंय. नव्या स्टार कास्टमध्ये टायगर श्रॉफचे नाव आधीच समजले होते. मात्र आता यात कोणत्या हिरोईन्स असणार आहेत याचाही खुलासा झालाय.

करणने हे गुपित उघडलंय. यात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया या दोघी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या स्टुडंट ऑफ दी इयर २मध्ये टायगर श्रॉफ लीडमध्ये दिसणार आहे. करणने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलेत. 

 

टायगर श्रॉफचे पोस्टर शेअर करताना म्हटलेय, यांना सेंट तेरेसामध्ये २०१८ वर्षासाठीचे अॅडमिशन मिळालेय. या सिनेमाचे शूटिंग डेहराडून येथे सुरु आहे. याचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करतायत. या सिनेमाच्या पहिल्या सिक्वेलमध्ये तीनही नवे कलाकार होते. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या भागातील या दोन नव्या अभिनेत्रींकडूनही खूप अपेक्षा आहेत.