'छपाक'च्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी दीपिकाचं STING OPERATION

 'छपाक' चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे.

Updated: Jan 16, 2020, 01:59 PM IST
'छपाक'च्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी दीपिकाचं STING OPERATION title=

मुंबई : 'ऍसिड फेकण्यामागे सर्वात मोठं कारण स्वत: ऍसिड आहे. जर ऍसिड तयार झालचं नाही तर तो फोकता येणार नाही.' असं म्हणत दीपिकाने स्वत:च्या हक्कांसाठी लढण्याचं आवाहन केलं आहे. 'छपाक' चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आहे. ऍसिड हा प्रकार वाईट विचारांच्या लोकांना लागलेला डाग आहे. एखादी मुलगी मुलाच्या प्रेमाला नाकारते तेव्हा सूड घेण्यासाठी तो तिच्यावर ऍसिड हल्ला करतो आणि त्या मुलीचा चेहरा विद्रुप करतो. 

पण अशाप्रकारे चेहरा विद्रुप करून कोणी एखाद्याचे स्वप्न कधीच पूसू शकत नाही. ऍसिड नक्की मिळतो कुठे, कशाप्रकारे त्याची विक्री केली जाते. अशा सर्व प्रश्नांचा उलगडा दीपिकाच्या एका STING OPERATIONच्या  माध्यमातून करण्यात आला आहे. 

दीपिकाचा 'छपाक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली पकड बसवू शकला नाही. पण समाजातील वास्तव समोर आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हे स्टिंग ऑपरेशन सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. 

१० जानेवारी रोजी 'छपाक' चित्रपटगृहात दाखल झाला. पण 'तान्हाजी' चित्रपटासमोर 'छपाक' आपला तग धरून राहण्यास अपयशी ठरला. दीपिकाच्या 'छपाक'विषयी सांगावं तर, तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने २० कोटींची कमाई केली. सुट्टीचा या चित्रपटाला काही अंशी फायदा झाला खरा. 

पण, पुन्हा एकदा या चित्रपटाना गवललेला वेग मात्र कुठेतरी हरवला आणि पुन्हा एकदा 'छपाक'च्या कमाईचा वेग मंदावला. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चा आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमध्येही 'तान्हाजी'चीच मोठ्या प्रमाणावर वाहवा होत असल्याचं स्पष्ट होत आहे.