अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींकडे राखीची विचित्र मागणी

पंतप्रधान मोदींकडे राखीने मागितली अशी गोष्ट; व्हिडिओ व्हायरल 

Updated: Sep 25, 2021, 01:24 PM IST
अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींकडे राखीची विचित्र मागणी title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कधी काय बोलेल आणि चर्चेत येईल? याबद्दल कोणीचं काहीही सांगू शकत नही. अशात तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी राखीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विचित्र मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मोदी पुन्हा मायदेशी आल्यानंतर काय घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर राखी मात्र पंतप्रधान मोदी तिच्यासाठी काय आणतील या प्रतीक्षेत आहे. 

खुद्द राखीने पंतप्रधान मोदींकडे विचित्र मागणी केली आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत, त्यामुळे तू त्यांच्याबद्दल काय बोलायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा राखीने संधी साधत मोदींकडे मोठी मागणी केली. तिची ही मागणी ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 

राखी म्हणाली, 'नमस्कार, मोदीजी... तुम्ही अमेरिकेला गेलात त्यामुळे मी आनंदी आहे. तेथील सर्व भारतीयांना माझ्याकडून प्रेम सांगा...' एवढ्यावर राखी थांबली नाही. पुढे म्हणाली, 'माझ्यासाठी काही तरी घेवून या... माझ्यासाठी अमेरिकन डॉलर आणा...' अशी विचित्र मागणी राखीने अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींकडे केली आहे.