सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशीसोबत कसं नातं आहे याविषयी त्याची सासू आणि लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.   

Updated: Aug 23, 2023, 04:27 PM IST
सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी हा सध्या ताली या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सुव्रत जोशी हा नेहमीच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. दरम्यान, सखीची आई म्हणजेच शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सखी आणि सुव्रतच्या लग्ना विषयी सांगितलं की सखीच्या लग्नासाठी त्यांच्या नजरेत काही मुलं होती मात्र, सखीनं सुव्रत विषयी सांगितलं. मग लग्नानंतर सुव्रतसोबत कसं नातं आहे याविषयी देखील शुभांगी यांनी सांगितलं आहे. 

शुभांगी या लवकरच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता राज हंचनाळे हे कलाकार देखील दिसणार आहेत. याच मालिकेत शुभांगी गोखले या तेजश्रीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर याच मालिकेच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच सखीसाठी मुलगा शोधला का? यावर उत्तर देत शुभांगी गोखले म्हणाल्या, 'सखीचं लग्नाचं वय झाल्यावर मी काही मुलांचा विचार करून ठेवला होता परंतु, प्रत्यक्षात तशी वेळच आली नाही कारण, तिनं मला सुव्रतबद्दल सांगितलं…त्यानंतर तो आमच्या घरी राहायलाच आला. मुलीचं पुढचं आयुष्य सुखाचं जावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. लेकीला चांगला जोडीदार मिळावा ही एकच भावना मनात होती आणि ती पूर्ण झाली.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे शुभांगी या त्यांच्या आणि जावयाचे नात्याविषयी बोलताना म्हणाल्या की, 'सुव्रत आणि माझं छान पटतं, आमच्यात चांगलं बॉन्डिंग आहे… आता अनेकदा आमच्या दोघांची एक टीम होते आणि आम्ही दोघं मिळून सखीला खूप त्रास देतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : महाराष्ट्रात राहतोस तर मराठी यायलाच हवी; अक्षय कुमारचा सार्वजनिक ठिकाणी अपमान झाला आणि...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शुभांगी या लवकरच प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्यांच्यासोबत तेजश्री प्रधान दिसणार असून तिच्या भूमिकेच नाव हे मुक्ता असणार आहे, तर अभिनेता राज हंचनाळे तिच्यासोबत दिसणार असून त्याच्या भूमिकेचं नाव सागर असणार आहे. तर शुभांगी या मुक्ताच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेत त्यांच्याशिवाय अपूर्वा नेमळेकर, ईशा परवडे देखील दिसणार आहेत. ही मालिका 4 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर तुम्ही संध्याकाळई 8 वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहू शकता.