Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या OMG 2 या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात अक्षयनं महादेव यांच्या दुतची भूमिका साकारली आहे. अक्षयचा हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि संपूर्ण टीमनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून अक्षय कुमारनं बॉक्स ऑफिसवर स्वत: चा पुन्हा एकदा जम बसवला आहे. आज अक्षय अनेक ठिकाणी प्रमोशनला गेले असताना तो मराठीत बोलताना देखील दिसतो. आज अक्षय इतकी सुंदर मराठी बोलत आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? की मराठी येत नाही म्हणून सार्वजनिक ठिकाणी अक्षयचा अपमान करण्यात आला होता त्यामुळे अक्षयनं मराठी भाषा शिकण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याचे परिणाम आज आपण पाहू शकतोय.
सगळ्यात आधी अक्षयच्या लहाणपणीविषयी जाणून घेऊया. अक्षयचा जन्म अमृतसरला झाला होता. त्याचे वडील हे सैन्यात होते. तर अक्षय दिल्लीच्या चांदणी चौक परिसरात लहाणाचा मोठा झाला. तर जेव्हा त्याचे वडील सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत ते मुंबईत रहायला लागले. मुंबईच्या सायन परिसरातील कोळीवाड्यात राहू लागले. त्यांच्या घराचं भाडं हे शंभर रुपये असल्याचे त्यानं एका मुलाखतीत सांगितले होते. लहाणपण हे चांदणी चौकात गेल्यामुळे अक्षयला तिथलीच भाषा येत होती. त्यातही अक्षय हा इंग्रजी शाळेत शिकला होता. त्यामुळे अक्षयला हिंदी आणि इंग्रजी या दोनचं भाषा येत होत्या.
दरम्यान, एकदा अक्षय बसनं शाळेत जात असताना त्यानं कशीबशी त्याच्या शाळेची मोठी बॅग कशी बशी सांभाळली. त्यामुळे तो कसा बसा एका ठिकाणी जाऊन उभा राहिला. तर मागूण कंडक्टर आले आणि त्यांनी त्याला तिकीट दिल्यावर पुढे सरकण्यास सांगितले. कंडक्टर मराठीत बोलत असल्यामुळे अक्षयला कळलं नाही त्यामुळे तो तिथेच उभा राहिला. कंडक्टर दोन-तीनवेळा तिच गोष्ट सांगू लागले मात्र, अक्षय जागेवरून हललाच नाही. शेवटी रागानं कंडक्टर यांनी अक्षयला पुढे ढकलंले आणि ते म्हणाले की पुढे सरक असं म्हटलं तरी कळत नाही. कंडक्टर काही तरी बोलत आहेत, हे कळताच अक्षय म्हणाला की 'आप क्या बोल रहे हो जे समज नही आ रहा.' त्यावर एका सहप्रवाश्यानं अक्षयला हिंदीत सांगितलं की पिछे भीड हो रही है इसलिये वो तुम्हे आगे जाने के लिए कह रहे हैं. हे ऐकताच अक्षय रागावून म्हणाला की तुम्हाला हे हिंदीत सांगता येत नाही.
हेही वाचा : जावयाला बगल देत 'खास' मित्राचा 'गदर 2' पाहायला पोहोचल्या डिंपल कपाडिया...
अक्षयचं असं चिडणं बघून कंडक्टर देखील चिडले आणि म्हणाले तू महाराष्ट्रात आहेस तर मराठी आलीच पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी अक्षयला बसमधून हकलवून लावले. सार्वजनिक ठिकाणी झालेला हा अपमान अक्षय कुमारच्या मनाला लागला. पण त्याला हे कळलं की आपण जिथे राहतो तिथली भाषा ही आपल्यालाच आलीच पाहिजे. त्यानंतर त्यानं मराठी शिकण्याकडे लक्ष दिलं आणि शाळेतही त्याच्या मराठीच्या लेक्चरमध्ये लक्ष देऊ लागला. इतकंच नाही तर त्याची पहिली गर्लफ्रेंड ही मराठीच होती.